विराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज

 टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 27, 2017, 06:02 PM IST
 विराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज  title=

नवी दिल्ली :  टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या. 

कुंबळे आणि कोहली यांच्याती वादानंतर मीडियामध्ये रवि शास्त्री यांनी टीमच्या मुख्य कोच पदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शास्त्री यांनी या गोष्टीचा खुलासा केला. 

रवि शास्त्री म्हणाले, मी या पदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे.  

विशेष म्हणजे २० जून रोजी विराट कोहलीशी झालेल्या मतभेदामुळे अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिला होता. 

शास्त्री २०१४ आणि २०१६ या काळासाठी भारतीय क्रिकेट टीमचे मॅनेजर म्हणून काम केले आहे. यात त्याने २०१५ चा विश्व चषक आणि २०१५ टी-२० विश्व कप सेमीफायनल टीमचे नेतृत्त्व केले होते. 

त्याने २०१६ या पदासाठी अर्ज केला होता. पण अनिल कुंबळेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.