रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य मुंबईकडून ओपनिंग करणार

अजिंक्य रहाणे मुंबईच्या टीममध्ये

Updated: Dec 5, 2019, 01:31 PM IST
रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य मुंबईकडून ओपनिंग करणार title=

मुंबई : भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा मुंबईकडून रणजी खेळताना दिसणार आहे. अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये ओपनिंगला खेळणार आहेत. पुढच्या आठवड्यात मुंबईचा यंदाच्या रणजी मोसमातला पहिला सामना बडोद्याशी होणार आहे. सर्वाधिक ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकणारी मुंबई ९ डिसेंबरला पहिली मॅच खेळणार आहे.

मुंबईच्या टीमचं नेतृत्व पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादव याआधीही मुंबईचा कर्णधार होता. तर विकेट कीपर आदित्य तरे उपकर्णधार आहे. युवा ऑलराऊंडर शम्स मुलानीलाही टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

अजिंक्य रहाणे हा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टेस्टमध्येही रहाणेने रन केल्या आहेत. तर पृथ्वी शॉ ८ महिन्यांच्या बंदीनंतर पुनरागमन करत आहे. जुना फॉर्म परत मिळवण्याचं आव्हान पृथ्वी शॉ पुढे असणार आहे.

मुंबईची टीम 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिष्टा, शुभम रांजणे, आकाश पारकर, सरफराज खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अतर्डे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, एकनाथ केरकर