'भारतीय खेळाडूंना सेक्स करायला सांगणं सगळ्यात मोठी चूक'

भारतीय खेळाडूंना मॅच आधी सेक्स करायला सांगणं ही सगळ्यात मोठी चूक होती

Updated: May 16, 2019, 06:13 PM IST
'भारतीय खेळाडूंना सेक्स करायला सांगणं सगळ्यात मोठी चूक' title=

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना मॅच आधी सेक्स करायला सांगणं ही माझ्या कार्यकाळातली सगळ्यात मोठी चूक होती, असं वक्तव्य भारतीय टीमचे माजी मानसिक प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी केलं आहे. पॅडी अप्टन यांनी 'द बेयरफुट कोच' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी भारतीय टीमबाबत वेगवेगळे खुलासे केले आहेत.

आपल्या पुस्तकात अप्टन म्हणतात, 'मी खेळाडूंना काही करायला सांगत नव्हतो. मी फक्त माहिती देत होतो. माध्यमांनी ज्याचा संदर्भ घेऊन बातम्या दिल्या तो एक विनोद होता. मी खेळाडूंना कोणताही सल्ला दिला नाही. तो फक्त विनोद होता आणि मी चूक केली. माझ्या व्यावसायिक आयुष्यातली ती सगळ्यात मोठी त्रुट होती.'

५० वर्षांच्या पॅ़डी अप्टन यांच्या पुस्तकात 'इगो अॅण्ड माय ग्रेटेस्ट फ्रोफेशन एरर' नावाचा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये अप्टन यांनी या वादाचा उल्लेख केला आहे. दक्षिण आफ्रिकेत २००९ साली झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्यांनी भारतीय खेळाडूंसाठी एक दस्तावेज तयार केला होता. यामध्ये त्यांनी सीरिजआधी सेक्समुळे होणाऱ्या फायद्यांबाबत माहिती दिली होती.

पॅडी अप्टन यांच्या या सल्ल्यामुळे तेव्हाचे भारतीय टीमचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन नाराज झाले. अखेर वादानंतर पॅडी अप्टन यांनी माफी मागितली. कर्स्टन प्रशिक्षक असताना खेळाडूंनी फिट राहण्यासाठी सेक्स करण्याचा सल्ला दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. यानंतर कर्स्टन आणि अप्टन यांना वादाचा सामना करावा लागला होता.

गंभीर असुरक्षित, नकारात्मक

अप्टन आपल्या पुस्तकात म्हणतात, 'मी गंभीरसोबत माझं सर्वश्रेष्ठ काम केलं, पण हे काम त्याच्यावर सगळ्यात कमी प्रभावी राहिलं. २००९ साली गंभीरला सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटर हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळीही मी गंभीरसोबत काम केलं होतं, पण या पुरस्काराचा आणि माझ्या कामाचा काहीही संबंध नव्हता.'

'गौतम गंभीर हा शतक केल्यानंतरही दु:खी असायचा. जेव्हा तो १५० रन करायचा, तेव्हा २०० रन का झाल्या नाहीत, याबद्दल त्याला वाईट वाटायचं. आपल्या काय चुका झाल्या, यावर त्याचा जोर असायचा', असं अप्टन यांनी या पुस्तकात सांगितलं आहे.

गंभीर नकारात्मक आणि निराशावादी

'मी आणि तेव्हाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी गौतम गंभीरबाबत सगळं काही केलं, तरी तो नकारात्मक आणि निराशावादी असायचा. मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्यापैकी गंभीर हा सगळ्यात कमजोर आणि मानसिकदृष्ट्या सगळ्यात असुरक्षित होता. असं असलं तरी तो जगातला सर्वश्रेष्ठ बॅट्समनपैकी एक होता. हेच त्याने २०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये सिद्ध केलं. भारताचा माजी कर्णधार धोनी हा भावनांवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवणारा होता, असं अप्टन म्हणाले.