आयसीसीकडून सचिन-विनोदचा हा व्हिडिओ ट्रोल, सचिनचे चोख प्रत्त्युतर

बॉलिंग करतानाचा व्हिडिओ शूट करुन सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला.

Updated: May 16, 2019, 03:21 PM IST
आयसीसीकडून सचिन-विनोदचा हा व्हिडिओ ट्रोल, सचिनचे चोख प्रत्त्युतर    title=

मुंबई : सचिन तेंडुलकर मैदानात खेळताना अनेकदा प्रतिस्पर्धी टीमला आपल्या बॅटने  प्रत्त्युतर दिल्याचे आपण पाहिले आहे. सचिनने नेहमीच मैदानात वाकयुद्धापेक्षा  बॅटने सडेतोड उत्तर दिले आहे. सचिनने कधीच पंचांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले नाही. वेस्टइंडिजचे माजी अंपायर स्टीव बकनर यांच्यावर तेंडुलकरला अनेकदा चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचे बोलले जाते. त्यावरुन सचिनने शेअर केलेल्या एका व्हिडिओवर आयसीसीने सचिनला ट्विटद्वारे  ट्रोल केले आहे. याला सचिनने आपल्या नेहमीच्याच शैलीत उत्तर दिले आहे. 

सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो नवख्या खेळाडूंना क्रिकेटचे धडे देत आहे. असाच एक बॉलिंग करतानाचा व्हिडिओ शूट करुन सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला. या व्हिडिओमध्ये सचिन आपल्या  सहकारी विनोद कांबळीला बॉलिंग करताना दिसतोय. तसेच सचिनची  बॅटिंग यात पाहता येतेय. हा संपूर्ण  व्हिडिओ सचिनने शेअर केला. 

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन अनेक नवख्या  खेळाडूंना  Tendulkar-Middlesex Global Academy द्वारे  क्रिकेटचे प्रशिक्षण देतोय. यामध्ये विनोद कांबळी देखील सचिन सोबत असतो. सचिनने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, 'विनोद कांबळी सोबत पुन्हा एकदा खेळून आनंददायी वाटलं. या व्हिडियोमुळे आमच्या लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.  फार कमी लोकांना माहिती आहे की, मी आणि विनोद नेहमी एकाच टीमकडून खेळलो आहोत. आम्ही कधीच एकमेकांविरुद्ध खेळलो नाहीत.'

आयसीसी काय म्हणाली 

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओला आयसीसीने एका फोटोद्वारे ट्रोल केले आहे. यामध्ये आयसीसीने वेस्टइंडिजचे  माजी अंपायर स्टिव बकनर यांचा फोटो टाकला आहे. या फोटोत स्टीव बकनर नो बॉल देत असल्याचा फोटो शेअर केला आहे. आपल्या पायावर लक्ष देण्याचा सल्ला आयसीसीने या फोटोद्वारा दिला आहे. 

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॉलिंग दरम्यान त्याचा पाय, अनेकदा लाईनीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे स्टीव बकनर यांचा नो बॉलच्या इशाराच्या फोटो शेअर केला आहे.

   

 

आयसीसीच्या ट्विटला सचिनचे प्रत्युतर 

सचिनच्या व्हिडिओवर आयसीसीने केलेल्या कमेंटला सचिनने चोख प्रत्युतर दिले. मी यावेळी बॉलिंग करतोय बॅटिंग नाही ? अंपायरचा निर्णय नेहमीच अंतिम असतो का ? सचिनचे प्रत्युतर अनेकांना आवडले. यावेळी सचिनने स्टीव बकनरवर उघड उघड टीका केली नाही. परंतु सचिनच्या चाहत्यांनी स्टीव बकनरवकर अनेकदा टीका केली आहे. 

 

 

स्टीब बकनर यांनी अनेकदा सचिनला चुकीच्या पद्धतीने आऊट असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे सचिनला डिवचण्यासाठी आयसीसीने देखील जाणीवपूर्वक स्टीव बकनरचा फोटो वापरला असावा, असं म्हटलं जात आहे.