IND vs PAK सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही; द्रविडने स्पष्टच सांगितलं!

KL Rahul Ruled Out Of Pakistan : आता टीम इंडियाला (Indian Cricket Team) मोठा झटका बसल्याचं पहायला मिळत आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू भारत-पाकिस्तान सामना खेळणार नसल्याचं आता समोर आलं आहे.

Updated: Aug 29, 2023, 02:00 PM IST
IND vs PAK सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही; द्रविडने स्पष्टच सांगितलं! title=
Rahul Dravid, KL Rahul

Rahul Dravid On KL Rahul : आशियाई क्रिकेट करंडकचा शुभारंभ येत्या 30 सप्टेंबरला होत आहे. त्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहेत. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्यापासून आशिया कपचा नारळ फुटणार असल्याने टीम इंडियाचं लक्ष पाकिस्तानच्या कामगिरीवर असेल. सामना पाकिस्तानचा संघ जिंकणार यात काही शंका नाही. मात्र, त्यानंतर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये ती, पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी... अशातच आता टीम इंडियाला मोठा झटका बसल्याचं पहायला मिळत आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू भारत-पाकिस्तान सामना खेळणार नसल्याचं आता समोर आलं आहे.

केएल राहुल (KL Rahul) खरोखरच चांगली प्रगती करत आहे परंतु आशिया कपच्या भारताच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी म्हणजेच पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध तो सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही, अशी माहिती टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दिली आहे.

केएल राहुलचे फलंदाजी आणि विकेटकीपिंग करतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच आता त्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये केएल राहुल शानदार सिक्स मारताना दिसत होता. तर बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना दिसत आहे. अशातच आता तो पहिल्या दोन सामन्यात खेळणार नसल्याने त्याच्या जागी इशान किशनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आशिया कप स्पर्धेची घोषणा झाली. त्यावेळी चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत देखील हाच मुद्दा उपस्थित केला होता. राहुल पहिला सामना खेळणार नसल्याची शक्यता त्यांनी वर्तविली होती. त्यानंतर आता आगरकर यांच्या वक्तव्याला कोच राहुल द्रविड यांनी माहितीला दुजोरा दिला आहे.

पाहा टीम इंडिया

रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.