Asia Cup 2023 : कोण म्हणतं फीट न्हाय? टीम इंडियाचा प्रॅक्टिस Video पाहून पाकिस्तानचे धाबे दणाणले

Team India Practice Video : आगामी भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय.

Updated: Aug 29, 2023, 01:04 PM IST
Asia Cup 2023 : कोण म्हणतं फीट न्हाय? टीम इंडियाचा प्रॅक्टिस Video पाहून पाकिस्तानचे धाबे दणाणले title=
Team India Practice Video

Ind vs Pak, Asia Cup 2023 : क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड कपआधी सराव परीक्षा पार पडणार आहे. याचा पहिला पेपर असेल तो 2 सप्टेंबरला... या पेपरमध्ये नापास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हा पेपर असेल सर्वात आवडत्या विषयाचा म्हणजेच पाकिस्तानचा... आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन संघ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे आता बाबर आझम (Babar Azam) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची पुन्हा एकदा टक्कर होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असतानाच आता एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.

आगामी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी (IND vs PAK) टीम इंडिया मैदानात घाम गाळताना दिसत आहे. अशातच आता त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने देखील धास्ती घेतल्याचं दिसतंय. या व्हिडीओमध्ये कॅप्टन रोहित शर्मासह टीम इंडियाचे इतर खेळाडू सराव करताना दिसत आहेत. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघाच्या सरावात सामील झाल्याने आता टीम इंडियामध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे.

मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या फलंदाजांना आऊट साईड ऑफ गोलंदाजी करत आहेत. तर विराट कोहली पुल शॉटचा सराव करतोय. तर केएल राहुल आणि इशांत किशन किपिंग करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. सुर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन जास्त व्हिडीओमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे सुर्यकुमार बेन्चवर असणार का? असा सवाल विचारला जात आहे. तर अक्षर पटेल देखील फक्त फलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळे त्याला वरचा क्रम दिला जाईल की काय? असा सवाल विचारला जात आहे.

आणखी वाचा - ड्रेसिंग रूमध्ये बोलवून युवराज असं काय बोलला होता? 12 वर्षानंतर रोहित शर्माला अजूनही आठवतो 'तो' क्षण!

पाहा टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.