विम्बलडन : राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात

यंदाच्या विम्बलडन पुरुष एकेरीतून राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात आले आहे. चौथ्या फेरीत सोळ्याव्या मानांकीत लक्झेंबर्गच्या जाईल्स म्युलरनं नडालाच पाच सेट्समध्ये पराभव केला. 

Reuters | Updated: Jul 11, 2017, 09:39 AM IST
विम्बलडन : राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात title=

विम्बलडन : यंदाच्या विम्बलडन पुरुष एकेरीतून राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात आले आहे. चौथ्या फेरीत सोळ्याव्या मानांकीत लक्झेंबर्गच्या जाईल्स म्युलरनं नडालाच पाच सेट्समध्ये पराभव केला. 

पाच तास चाललेल्या या सामन्यात सुरुवातीचे दोन सेट गमावल्यावर नदालनं जोरदार कमबॅक केलं. तिसरा आणि चौथा सेट जिंकला. पण पाचव्या सेटमध्ये टेनिसचा अत्यंत संघर्षमय खेळ बघयाला मिळाला. अखेर जाईल्स म्युलरनं सामन्यात 6-3,6-4,3-6, 4-6,15-13  असा विजय मिळवला.  

तिकडे रॉजर फेडररनं चौथ्या फेरीच्या सामन्यात विजय मिळवत. उपउपांत्य फेरीत प्रवेश केलाय. फेडररनं ग्रेगोर द्विमीत्रोवचा 6-4,6-2,6-4 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या विजयानं फेडररनं ग्रँड स्लॅम स्पर्धेत पन्नास वेळा उपउपांत्य फेरी गाठण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय. आज विम्बलडनमध्ये महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.