Virat Kohli : जोरात ओरडून स्वतःच्याच छातीवर मारला मुक्का...; कोहलीच्या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

आरसीबीकडून ओपनिंगला आलेल्या फाफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहलीने उत्तम सुरुवात करून दिली. आजच्या सामन्यात कोहलीकडून चाहत्यांना फार अपेक्षा होत्या आणि विराटनेही चाहच्यांचं मन मोडलं नाही. विराटने तुफान खेळी करत अर्धशतक (Virat Kohli half century) झळकावलं आहे. 

Updated: Apr 15, 2023, 07:02 PM IST
Virat Kohli : जोरात ओरडून स्वतःच्याच छातीवर मारला मुक्का...; कोहलीच्या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल title=

Virat Kohli Celebration : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज 20 वा सामना खेळवला जातोय. रॉयल चॅलेंजर बंगळरू (Royal Challengers Bangalore) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवला गेला. दिल्लीच्या टीमने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी आरसीबीकडून ओपनिंगला आलेल्या फाफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहलीने उत्तम सुरुवात करून दिली. आजच्या सामन्यात कोहलीकडून चाहत्यांना फार अपेक्षा होत्या आणि विराटनेही चाहच्यांचं मन मोडलं नाही. विराटने तुफान खेळी करत अर्धशतक (Virat Kohli half century) झळकावलं आहे. 

विराटने झळकावलं अर्धशतक

विराटने आजच्या सामन्यात फलंदाजीला उतरत तुफान खेळीला सुरुवात केली. दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत 33 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावलं. यंदाच्या सिझनमधील त्याचं हे तिसरं अर्धशतक होतं. दरम्यान या हाफ सेच्युरीनंतर त्याने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे. विराटच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एक काळ असा होता, जेव्हा विराट त्याच्या खराब फॉर्ममधून जात होता. मात्र सध्या तो उत्तम फॉर्ममध्ये असल्याचं दिसतंय. आजच्या सामन्यातंही विराटने 6 फोर आणि एका सिक्सच्या जोरावर अर्धशतक मारलं. या अर्धशतकानंतर त्याने अगदी जुन्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे. 

विराटच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

1 रन काढून विराट कोहलीने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक झाल्यानंतर विराटने जोरात ओरडला आणि स्वतःच्याच छातीवर एक मुक्का मारला. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेले खेळाडू देखील खूश होऊन टाळ्या वाजवत होते. मुख्य म्हणजे विराटचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण त्याच्या पुढच्याच बॉलवर तो विकेट गमावून बसला.

दिल्लीचा 175 रन्सचं लक्ष्य

प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्लीसमोर 175 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक म्हणजेच 50 रन्स केले. याशिवाय महिपाल लोमररने 26 आणि ग्लेन मॅक्सवेलने 24 रन्सची खेली केली. मॅक्सवेलने देखील आजच्या सामन्यात काही मोठे शॉट्स खेळले, मात्र मोठा स्कोर करण्यात त्याला अपयश आलं. दुसरीकडे दिल्लीकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतले. 

दोन्ही संघांची प्लेईंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार, हर्षल पटेल, वेन पारनेल, 

दिल्ली कॅपिटल्स

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, एनरिच नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान.