मुंबई: मैदानात अपघात झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच कॅप्टन कूल धोनीला टेन्शन आलं. त्यामगचं कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे. अपघातात चेन्नई संघाचा खेळाडू होता. त्यामुळे धोनीला हा व्हिडीओ पाहून टेन्शन आल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात फील्डिंग दरम्यान एक अपघात घडला या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फील्डिंग दरम्यान फाफ ड्यु प्लेसिस आणि मोहम्मद हसनैन या दोघांमध्ये धडक झाली आणि दोघंही मैदानात कोसळले. दोघंही पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स टीमकडून खेळत होते. 7व्या ओव्हर दरम्यान फील्डिंग करत असताना बॉल पकडण्यासाठी दोघंही बाउंड्रीजवळ जाताच अपघात झाला. त्यानंतर दुखापत झालेल्या फाफ ड्युप्लेसिसला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं.
Praying to Almighty for the speedy recovery and a good health for #FafduPlessis
May he #getwellsoon ! pic.twitter.com/TT1JaTGFCH— An Indian (@real_farooque07) June 12, 2021
फाफ ड्युप्लेसिस हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स कॅप्टन कूल धोनीच्या संघाकडून खेळतो. कोव्हिडमुळे जरी 4 मे रोजी सामने स्थगित झाले असले तरी उर्वरित 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ड्युप्लेसी आणि मोहम्मद दोघांची बाउंड्री लाइनवर जोरदार धडक झाल्यामुऴे हा अपघात घडला. या अपघातात ड्युप्लेसिला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तो मैदानात पुन्हा कधी परतेल यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.