राजकोट : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु झालेल्या सामन्यात भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉनं पहिल्याच कसोटी सामन्यात दणदणीत शतक ठोकलं आहे. पदार्पणातच दणदणीत शतक ठोकत त्याने त्याचं महत्त्व दाखवून दिलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 सामन्यांची टेस्ट सिरीज होत आहे. यानंतर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
विशेष म्हणजे पृथ्वीने 98 बॉलमध्ये हे शतक ठोकलं आहे. पृथ्वीच्या नेतृत्वातच भारताने अंडर-१९ चा विश्वकप ही जिंकला होता. राजकोटच्या याच मैदानावर त्याने रणजी सामन्यात पदार्पण करत शतक ठोकलं होतं.
डेब्यू टेस्टमध्ये शतक ठोकणारा तो भारताचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. टेस्ट डेब्यूमध्ये सगळ्यात कमी बॉलमध्ये शतक ठोकणारा पृथ्वी तिसरा खेळाडू ठरला आहे.
शिखर धवन - 85 बॉलमध्ये शतक - ऑस्ट्रेलिया, मोहाली, 2013
ड्वेन स्मिथ - 93 बॉलमध्ये शतक - दक्षिण आफ्रिका, केपटाउन, 2004
पृथ्वी शॉ - 99 बॉलमध्ये शतक - वेस्टइंडिज, राजकोट, 2018
टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. 3 रनच्या स्कोरवर के.एल राहुल शुन्यावर आऊट झाला. पण यानंतर पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजाराने भारताची इनिंग सांभाळली आहे.