Prithvi Shaw, India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-ट्वेंटी सामना (IND vs NZ 1st T20I) खेळला जाणार आहे. राँचीच्या (Ranchi) मैदानावर हा सामना खेळवला जाईल. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असल्याने यंगिस्तानवर आता सर्वांची नजर असणार आहे. अशातच आता तब्बल 18 महिन्यानंतर सामिल करण्यात आलेल्या पृथ्वी शॉला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात येणार की नाही?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. अशातच आता बीसीसीआयच्या (BCCI) इंटरव्ह्यूमध्ये पृथ्वी शॉने मोठा खुलासा केलाय. (Prithvi shaw reveals interesting story about his team india comeback ahead of new zealand t20i series video)
टीम इंडियात निवड झाल्यानंतर माझे वडील आणि इतर सर्वजण खूप आनंदी होते. बऱ्याच दिवसांनी माझी टीम इंडियात (Team India) निवड झाली. रात्री साधारण साडेदहा वाजता न्यूझीलंडसाठी (India vs New Zealand) टीमची घोषणा झाली होती. त्यावेळी मी झोपलो होतो. माझा फोन सायलेंट मोडवर होता, उठल्यावर मी पाहिलं की खूप कॉल्स आणि मिसेज आले होते, असं पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सांगतो.
कॉल्स आणि मिसेजमुळे माझा फोन हँग झाला होता. त्यावेळी मला समजलं नाही काय करावं. नेमकं काय झालंय माहित नसल्याने मी घाबरलो होतो. त्यावेळी मला कळालं की, माझं टी-20 साठी सिलेक्शन झालंय. माझ्या वडिलांनी आणि जवळच्या मित्रांनी मला गुड न्यूज दिली होती, असं पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) म्हणतो.
From emotions on #TeamIndia comeback & the support system to reuniting with former U-19 teammates and Head Coach Rahul Dravid
as @PrithviShaw discusses all this & more - By @ameyatilak
Full interview #INDvNZhttps://t.co/ZPZWMbxlAC pic.twitter.com/IzVUd9tT6X
— BCCI (@BCCI) January 27, 2023
दरम्यान, मी टीममध्ये खेळत नसलो तरी त्यांनी माझी कधी साथ सोडली नाही. माझा परिवार, माझे मित्र आणि कोच यांनी मला खूप मदत केली, असंही पृथ्वी यावेळी म्हणाला. पहिल्या सामन्यात सलामीसाठी कोण खेळणार असा सवाल कॅप्टन पांड्याला विचारण्यात आल्यावर पृथ्वीला आणखी थोडं थांबावं लागेल, असं हार्दिक पांड्या (Hardik Pandya On Prithvi Shaw) म्हणाला.