श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रदूषणाचा व्यत्यय

भारत वि श्रीलंकेच्या सामन्यात प्रदूषणामुळे व्यत्यत आलाय. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याने सामना थांबवण्यात आला होता. १० ते १५ मिनिटे खेळ थांबवण्यात आला होता. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 3, 2017, 12:55 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रदूषणाचा व्यत्यय title=

नवी दिल्ली : भारत वि श्रीलंकेच्या सामन्यात प्रदूषणामुळे व्यत्यत आलाय. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याने सामना थांबवण्यात आला होता. १० ते १५ मिनिटे खेळ थांबवण्यात आला होता. 

दिल्लीत इतके प्रदूषण वाढलेय की श्रीलंकेचे खेळाडू तोंडाला मास्क लावून मैदानावर आहेत. श्रीलंकेच्या खेळाडूंकडून खेळ थांबवण्याची मागणी केली जात होती. मात्र १५ मिनिटानंतर पुन्हा खेळ सुरु करण्यात आला. 

दिल्लीच्या प्रदूषणाचा फटका यापूर्वी २०१६मध्ये बसला होता. त्यावेळी दोन रणजीचे सामने रद्द करण्यात आले होते.