Yuvraj Singh Tauba Tauba Dance : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वात इंडिया चॅम्पियन्सने वर्ल्ड चॅम्पियन लीगच्या (World Championship of Legends) ट्रॉफीवर नाव कोरलं. इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियनसचा (IND C vs PAK C) पराभव केला होता. इंडिया चॅम्पियन्सच्या विजयानंतर युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरैश रैना आणि गुरकीरत मान यांनी तौबा तौबा गाण्यावर डान्स केला. त्यावरून आता वाद पेटला आहे. याच डान्समुळे चारही क्रिकेटपटूंविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हरभजन सिंगने त्याच्या इन्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिग्गज खेळाडू युवराज, हरभजन आणि सुरेश रैना यांच्यासोबत गुरकीरत सिंग देखील दिसत आहेत. यामध्ये चौघंही तौबा तौबा गाण्यावर डान्स करताना लंगड्या अवस्थेत वॉक करताना दिसतायेत. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. त्यावर आता आक्षेप घेण्यात आलाय. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने यावर कमेंट केली.
"Tauba Tauba" featuring Indian legends.
@harbhajan3 #CricketGully #TeamIndia #WCL2024 #yuvrajsingh #harbhajansingh #sureshraina pic.twitter.com/ltjSuZ5AXZ
— Aussies Army (Parody) (@AussiesArmyParo) July 14, 2024
नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपलचे (NCPEDP) कार्यकारी संचालक अरमान अली यांनी अमर कॉलनी पोलिस स्टेशनच्या एसएचओकडे ही तक्रार दाखल केली आहे. क्रिकेटपटूंसोबतच मेटा इंडियाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी अत्यंत घृणास्पद आणि असंवेदनशील कृत्य केलं आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या अपंगांची अवहेलना करत आहात. असे हातवारे करणे म्हणजे नुसती मजा करणे नव्हे तर भेदभाव आहे आणि या चुकीबद्दल या खेळाडूंनी माफी मागितली पाहिजे, असं पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने म्हटलं आहे. त्यामुळे आता युवराजसह इतर खेळाडूंच्या अडचणी वाढणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान मिसबाह उल हक हा जखमी झाला होता. सामन्यावेळी त्याला दुखापत झाल्याने तो लंगडत मैदानातून बाहेर गेला. त्यामुळे युवराज आणि इतर खेळाडूंनी पाकिस्तानची थट्टा उडवण्यासाठी तौबा तौबा डान्स केल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांना हा डान्स महागात पडू शकतो.