विराटच्या या ट्वीटवर लोकांनी विचारले अनुष्का प्रेग्नेंट आहे का?

 विरुष्काच्या चाहत्यांची काही कमी नाही.

Updated: Mar 17, 2018, 08:36 AM IST
विराटच्या या ट्वीटवर लोकांनी विचारले अनुष्का प्रेग्नेंट आहे का? title=

मुंबई : विरुष्काच्या चाहत्यांची काही कमी नाही. त्यातच त्यांची सोशल मीडियावरची एक झलक चाहत्यांना पुरेशी पडते. लग्नानंतर आपआपल्या कामांमध्ये व्यस्त झालेले विरुष्काने अलिकडेच मुंबईतील आपल्या नव्या घरात एकत्र वेळ घालवला. याच वेळस विराटने केलेल्या एका ट्वीटमुळे अनुष्का प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

काय केले ट्वीट?

९ मार्चला विराटने ट्वीट केले होते की, 'There’s a lot that’s happening right now. Fill you guys in real soon!"

काय म्हटले युजर्संनी?

त्यानंतर त्यांच्या फॅन्सने वेगवेगळे तर्क लढवायला सुरूवात केली. आणि घरी नवा पाहुणा येणार असल्याचे आता म्हटले जात आहे. लोकांनी केलेल्या अशाप्रकारच्या कमेंट्सना विरुष्काने कोणत्याही प्रकारचे उत्तर देणे टाळले आहे.