Pravin Kumar Won Gold Medal In High Jump Paralympics 2024 : ऑलिम्पिक 2024 नंतर पॅरिसमध्ये पॅरालिम्पिकचे आयोजन करण्यात आले असून आज या स्पर्धेचा आठवा दिवस आहे. आठव्या दिवशी भारताने टोकियो ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे. भारताचा हाय जंप (T44) ऍथलिट प्रवीण कुमार याने पुरुषांच्या हाय जंपमध्ये सुवर्ण पदक मिळवलं , त्यामुळे आता भारताच्या खात्यात एकूण 6 सुवर्ण पदकांचा समावेश झाला आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच 6 सुवर्ण पदकांना गवसणी घातली, यापूर्वी भारताच्या खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एकूण 5 सुवर्ण पदक जिंकली होती.
प्रवीण कुमारने पुरुषांच्या हाय जंपमध्ये 2.08 मीटर उंच उडी घेऊन सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत अमेरिकेच्या डेरेक लॉकडेंटने रौप्य तर उझबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाझोव्हने कांस्य पदकाला गवसणी घातली. डेरेक लॉकडेंटने 2.06 मीटर तर टेमुरबेकने 2.03 मीटर उंच उडी मारून पदक जिंकली. प्रवीण कुमारच्या सुवर्ण पदकानंतर आता भारताच्या खात्यात एकूण 26 पदकांचा समावेश झाला आहे. प्रवीण कुमार हा जन्मापासून अपंग आहे. शाळेत असल्यापासून प्रवीण हा खेळांमध्ये सहभागी व्हायचा. जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा होती, तेव्हा त्याने गुगल सर्च इंजिनचा सदुपयोग करून माहिती काढली. प्रवीण हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून तो 21 वर्षांचा आहे. भारताकडे आता 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 11 कांस्य पदकांचा समावेश आहेत.
आयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारताने यंदा 84 खेळाडूंचा समूह पाठवला आहे. हे खेळाडू विविध 12 स्पर्धांमध्ये भाग घेणार असून यात 52 पुरुष तर 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता 9 सप्टेंबरला होईल. अवनी लखेरा, नितेश कुमार, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, धरमबीर आणि प्रवीण कुमार यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.