Champions Trophy Latest Update: चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचा गोंधळ अनेक दिवसांपासून सुरु आहे. याबद्दल रोज नववीन अपडेट्स येत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. तेव्हापासून 'हायब्रीड मॉडेल'ची चर्चा आहे. आयसीसीने ( ICC) याबाबतची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) दिली आहे. पण तरीही अजूनही पीसीबी अद्याप तयार नाही. पीसीबी रोज अटी घेऊन पुढे येत आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. कमी वेळ उरला असला तरी, अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक बुधवारी जाहीर होऊ शकते अशी चर्चा आहे. दरम्यान आता पाकिस्तानने नवी अट घातली आहे. पीसीबीने भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेलवर आयसीसीकडून लेखी आश्वासन मागितले आहे. या गोंधळादरम्यान, पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे सामने दुबईत खेळेल जातील तर स्पर्धेचे उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होतील. जर टीम इंडिया उपांत्य फेरी किंवा फायनलमध्ये पोहोचली तर तो सामनाही दुबईतच होणार आहे.
हे ही वाचा: CT 2025: टीम इंडिया 'या' सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा; माजी क्रिकेटरचा दावा
सूत्रांनी सोमवारी आयएएनएसला सांगितले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ला आयसीसीकडून भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या हायब्रीड मॉडेलबाबत भारताकडून लेखी आश्वासन हवे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचा निर्णय बुधवारपर्यंत होण्याची शक्यता आहे." या मुद्द्यावर कोणतेही एकमत होण्यापूर्वी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची भेट घेतली. कोणत्याही करारावर सहमती देण्यापूर्वी पीसीबी सरकारशी सल्लामसलत करेल, असे त्यांनी वारंवार सांगितले आहे.
हे ही वाचा: सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण...
या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून त्यापैकी चार संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील, त्यानंतर विजेतेपदाचा सामना होईल. गेल्या वर्षी, भारताने पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने पुरुषांच्या 50 षटकांच्या आशिया कपचे हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजन केले होते. भारताने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह स्पर्धेतील आपले सर्व सामने खेळले. त्या स्पर्धेत टीम इंडिया चॅम्पियन झाली.