आशिया कपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का; स्टार खेळाडू ODI World Cup स्पर्धेतून बाहेर

आशिया कपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानी संघाला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असून वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 16, 2023, 06:11 PM IST
आशिया कपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का; स्टार खेळाडू ODI World Cup स्पर्धेतून बाहेर title=

आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडलेला पाकिस्तान संघ आता आगामी एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. पण आशिया कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलेल्या पाकिस्तानला वर्ल्डकपआधी मोठा धक्का बसला आहे. याचं कारण पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज नसीम शाह वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता आहे. नसीम शाह याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. सुरुवातीला ही सौम्य दुखापत असल्याचं वाटत होतं. पण ही गंभीर दुखापत असल्याच संमोर आलं आहे असं वृत्त espncricinfo ने दिलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यासंदर्भात सल्लासमलत करत आहे. पण दुबईत स्कॅन केलं असता, यामध्ये ही दुखापत पाहता नसीम शाह वर्ल्डकपमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबदरम्यान भारतात वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. 

नसीम याला या दुखापतीमुळे मोठी विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरोधा होणाऱ्या कसोटी मालिकेत तो सहभागी होण्याती शक्यता कमी आहे. याशिवाय पाकिस्तान सुपर लीग 2024 लाही तो मुकण्याची शक्यता आहे. 

आशिया कपमध्ये भारताविरोधातील सामन्यात नसीम शाह जखमी झाला होता. रिझर्व्ह डेच्या दिवशी 46 व्या ओव्हरमध्ये नसीन शाहच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि यानंतर तो सामना खेळू शकला नव्हता. 

नसीम शाह जर वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेला मुकला तर हा पाकिस्तानसाठी फार मोठा धक्का असेल. पाकिस्तानच्या गोलंदाजीला धार देणाऱ्यांमध्ये नसीन, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांची मोलाची भूमिका आहे. 

दरम्यान नसीम शाहची आणखी एकदा वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, त्याचे अहवाल समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अधिकृतपणे घोषणा करु शकणार आहे. आशिया कपमध्ये नसीम शाहच्या जागी झमन खानला संधी देण्यात आली होती. दरम्यान बदली खेळाडू असणारा मोहम्मह हसनैनही जखमी आहे. 

नसीमला त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला आहे. 17 वर्षांचा असताना पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील एक वर्ष वाया गेलं होतं. 14 महिने तो क्रिकेटपासून दूर होता. दरम्यान पुनरागमन केल्यानंतर सहा महिन्यात त्याला खांद्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता.

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबदरम्यान भारतात वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे.