PAK vs NED : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा रडत रडत विजय; नेदरलँडने केला नाकात दम!

ICC One Day World Cup : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात (PAK vs NED) पाकिस्तानने नेदरलँडचा पराभव केला. मात्र, नेदरलँडने पाकिस्तानच्या नाकात दम केला होता. अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा विजय झालाय.

Updated: Oct 6, 2023, 09:52 PM IST
PAK vs NED : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा रडत रडत विजय; नेदरलँडने केला नाकात दम! title=
PAK vs NED, world cup 2023

Pakistan vs Netherlands : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा पराभव केला आहे. पाकिस्तान संघाने 286 धावांचं आव्हान नेदरलँडला दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना नेदरलँडला चांगली सुरूवात होऊन देखील विजय मिळवला आला नाही अन् सामना 81 धावांनी गमवावा लागला. हैदराबादच्या मैदानावर पाकिस्तान संघाची फलंदाजी चांगली झाली नाही. कमकुवत नेदरलँड्सविरुद्ध पाकिस्तानचा संघ केवळ 49 ओव्हर खेळू शकला आणि 286 धावांवर ऑलआऊट झाला. त्यासाठी केवळ मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांना सर्वाधिक 68-68 धावा करता आल्या. शादाब खाननेही 32 धावांची खेळी केली. 

नेदरलँडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाजही झटपट बाद झाले. फकर झमान, उमाम उल हक अन् कॅप्ट बाबर आझम झटपट बाद झाले. 38 वर 3 गडी बाद अशी पाकिस्तानची अवस्था होती. त्यामुळे पाकिस्तानवर दडपण दिसून आलं. पाकिस्ताने 49 षटकात सर्व गडी गमवत 286 धावा केल्या. नेदरलँडच्या बास डी लीडे याने सर्वाधिक 4 विकेट पटकावल्या. तर कॉलिन अकरमन याने दोन गडी तंबूत पाठवले.

पाकिस्तानने दिलेल्या 287 धावांचं आव्हान पार करताना नेदरलँडची सुरूवात चांगली झाली. मॅक्स ओडॉड लवकर बाद झाल्यानंतर विक्रमजीत सिंग आणि बास डी लीडे यांनी पाकिस्तान नाकात दम केला. त्यामुळे बाबर आझमचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, हसन अली याने विक्रमजीतला बाद केलं अन् पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केलं. त्यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बाद होत राहिले. नेदरलँडचा संघ 41 ओव्हरमध्ये बाद झाला. त्यांना फक्त 205 धावा करता आल्या आहेत. मात्र, नेदरलँडने पहिल्याच सामन्यात आम्ही देखील वर्ल्ड कप खेळतोय, हे सिद्ध केलंय. तर विजयानंतर देखील पाकिस्तानच्या संघात नाराजीचं वातावरण असणार आहे.

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

नेदरलँडचा संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.