क्रिकेट वर्ल्ड कपच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने मानली हार, 50 लाख गमावले.. पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?

भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. त्यामुळे भारतात सध्या क्रिकेटमय वातावरण आहे. छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती'मध्येही विश्वचषकासंदर्भातच प्रश्न विचारले जात आहेत. 

राजीव कासले | Updated: Oct 6, 2023, 09:04 PM IST
क्रिकेट वर्ल्ड कपच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने मानली हार, 50 लाख गमावले.. पाहा तुम्हाला उत्तर येतंय का? title=

ICC World Cup 2023 : आयसीस एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. यंदा भारत या स्पर्धेचा आयोजक देश आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धा सुरु झाली असून 19 नोव्हेंबरपर्यंत क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामन्यांची मेजवाणी मिळणार आहे.  त्यामुळे भारतात सध्या सर्वत्र क्रिकेटचा फिवर पाहिला मिळतोय. टेलिव्हिजनवरच्या 'कौन बनेगा करोडपती'  (Kaun Banega Creorepati 15) या कार्यक्रमातही स्पर्धकांना विश्वचषक (Wordl Cup) स्पर्धेसंदर्भात काही प्रश्न विचारले जात आहेत. नुकत्याच झालेल्या एका भागात बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी क्रिकेट विश्वचषकावर विचारलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने हार मानली.

50 लाख रुपयांवर सोडलं पाणी
'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो आहे. अमिताब बच्चन या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतात. या कार्यक्रमात सहभागी झालेले काही मोजकेच स्पर्धक करोडपती बनू शकले आहेत. स्पर्धक जसजसा  एकेएक टप्पा पार करत जातो, तसतते प्रश्न आणकी अवघड होत जातात. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेशी संबंधित असाच एक प्रश्न स्पर्धकाला विचारण्यात आला आणि स्पर्धकाने स्पर्धेतून माघार घेतली. अमिताभ बच्चन यांनी 50 लाख रुपयांसाठी हा प्रश्न विचारल होता. पण या प्रश्नचं उत्तर देण्यात स्पर्धक अपयशी ठरला.

स्पर्धकाने घेतली माघार
राहुल नावाचा स्पर्धक कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटवर होता. आपलं नॉलेज आणि सर्व लाईफलाईनचा वापर करत राहुलने 25 लाख रुपयांपर्यंताच टप्पा पूर्ण केला. पण 50 लाख रुपयांसाठीच्या प्रश्नावर तो अडकला. त्याच्याजवळ एकही लाईफलाईन शिल्लक नव्हती. अखेर त्याने 25 लाखांवर समाधान मानत स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

काय होता प्रश्न?
1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकावर पहिल्यांदा नाव कोरलं. अंतिम सामन्यात बलाढ्य आणि दोनवेळच्या जग्गजेत्या वेस्ट इंडिजवर मात करत भारताने विश्वचषक पटकावला. 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी याच संदर्भात स्पर्धक राहुलला प्रश्न विचारला.

भारतीय संघाला कमी लेखत 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत कोणत्या पत्रकाराला आपणच लिहिलेला लेख भारताच्या विजयानंतर गिळावा लागला होता?

पर्याय होते

A- गिदोन हाई

B- क्रिस्टोफर मार्टिन-जेनकिंस

C- स्किल्ड बेरी

D- डेव्हिड फ्रिथ।

उत्तर आहे - डेव्हिड फ्रिथ

पत्रकार डेव्हिड फिथ यांनी भारत कधीच विश्वचषक जिंकू शकणार नाही अशी टीका करणारी भविष्यावाणी करत त्यावर लेख लिहिला होता.