Azhar Ali Retirement : टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये (India vs Bangladesh) दोन कसोटी सामने खेळवले जात आहे. यामधील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) विजय निश्चित मानला जात आहे. त्यात आता टीम इंडियाच्या विजयाची चर्चा असताना, स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. हा खेळाडू कोण आहे, हे जाणून घेऊयात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या टीम इंडिया विरूद्ध बांगलादेशमध्ये (India vs Bangladesh) टेस्ट सामने खेळवले जात आहे. त्याचसोबत टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये (Pakistan Vs England) देखील कसोटी सामने सुरु आहेत. या सामन्या दरम्यानच पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीने (Azhar Ali Retirement) कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयाने पाकिस्तान संघाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan Vs England) यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज अझहर अलीने (Azhar Ali Retirement) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.कराचीमध्ये तो इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे.
आपल्या देशासाठी सर्वोच्च स्तरावर खेळणे हा सन्मान आणि विशेषाधिकार असल्याचे अझहर अली म्हणतो. कोणत्या दिवशी निवृत्त होणार हे सांगणे फार कठीण होते. पण खुप विचार केल्यावर असं लक्षात आलं की माझ्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे,असे कसोटीतून निवृत्ती घेताना अझहर (Azhar Ali Retirement) म्हणाला आहे.
पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीने (Azhar Ali Retirement) पाकिस्तान संघासाठी 96 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 42.5 च्या प्रभावी सरासरीने 7097 धावा केल्या आहेत. अझहरने कसोटीत 19 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर त्याने 3 वेळा कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले आहे. अझहरने पाकिस्तानसाठी एकदा त्रिशतकही ठोकले आहे. तसेच अझहरने पाकिस्तानकडून एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्याने 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने 3 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. त्याच्या वनडेत 1845 धावा आहेत.
दरम्यान अजहर अली (Azhar Ali Retirement) हा पाकिस्तान कसोटी संघाचा महान फलंदाज मानला जातो. त्याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीने पाकिस्तानी संघ आणि क्रिकेट फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.