BAN vs IND: भारत आणि बांगलादेश (BAN vs IND:) यांच्यामध्ये चंटगाव टेस्ट सामन्याचा दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खूर चर्चेत राहिला. सिराजने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडवली. सिराजनंतर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) मोर्चा सांभाळत पच विकेट पटकावले. बांगलादेशाच्या टीमचा पहिला डाव अवघ्या 150 रन्सवर आटोपला. दरम्यान दुसऱ्या दिवशी लिटन दाससोबत (Litton Das) नेमकं काय घडलं, हे देखील सिराजने सांगितलं आहे.
ही घटना बांगलादेशाचा डाव सुरु असताना 14 व्या ओव्हरमधील आहे. वेगवाग गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या गोलंदाजीने बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडवली. यावेळी ओव्हररचा पहिला बल लिटन दास खेळत होता. त्याने हा बल उत्तम पद्धतीने डिफेंस केला. यावेळी सिराज काहीसा भडकला. सिराजने रागाच्या भरात लिटन दासकडे पाहिलं आणि अपशब्द वापरले. सिराजचा पार चढलेला पाहून लिटन दास देखील मागे हटला नाही. त्याने, कानाच्या मागे हात धरत, ऐकू येत नसल्याची एक्शन केली.
पुढच्याच बॅालवर लिटन क्लिन बोल्ड झाला. सिराजनेच त्याची विकेट काढली. यावेळी विराटही मागे राहिला नाही आणि त्यानेही लिटनच्या एक्शनवर रिएक्शन दिली. दरम्यान यावेळी ऑनफील्ड अंपायरने पुढाकार घेत प्रकरण शांत केलं.
सोशल मीडियावर लिटन दास आणि मोहम्मद सिराजचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता, की सिराजने लिटन दासला काय सांगितलं? दुसऱ्या दिवसाच्या शेवटी सिराजला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना सिराज म्हणाला, असं काही नाहीये, मी फक्त त्याला थोडं समजून खेळायला सांगितलं. कारण हे टी-20 क्रिकेट नाहीये.
चट्टोग्राम कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या डावात 404 धावा करता आल्या. चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 90 धावा तर श्रेयस अय्यरने 86 आणि रविचंद्रन अश्विनने 58 धावांचे योगदान दिले. या तीन फलंदाजांशिवाय पंतने 46 आणि कुलदीप यादवने 40 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज आणि तैजुल इस्लाम यांनी सर्वाधिक 4-4 विकेट घेतले
शुभमन गिलला टीम इंडियाच्या पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नव्हती. त्याला निव्वळ 20 धावावर बाद व्हावे लागले होते. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती. ही अपेक्षा त्याने दुसऱ्या डावात पुर्ण केली. त्याने दुसऱ्या डावात 148 बॉलमध्ये शतकीय खेळी केली. या त्याच्या खेळीने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 200 धावा पुर्ण केल्या आहेत.