T20 WC 2022 Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं, नेट रन रेटमुळे...

...तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये जाणार, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजयानंतर पॉईट्स टेबलचं समीकरण बदललं

Updated: Nov 4, 2022, 12:03 AM IST
T20 WC 2022 Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं, नेट रन रेटमुळे... title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) काल बुधवार पर्यंत पाकिस्तान (Pakistan) सेमी फायनलमधून बाहेर गेल्याची चर्चा सुरु होती. मात्र आज पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (pakistan vs south africa) दणदणीत विजय मिळवला.या विजयानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा सेमी फायनलच्या शर्यतीत आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं (Team India) टेन्शन देखील वाढणार आहे. दरम्यान पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवल्यानंतर पॉईट्स टेबलचं गणित कसं असणार आहे. हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : टीम इंडियाच्या पराभवासाठी पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात,झिंबाब्वेला दिली खुली ऑफऱ

पॉईंटस् टेबल

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध  (south africa) विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान 4 गुणांसह ग्रुप 2 मध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर साऊथ आफ्रिका पराभवानंतरही 5 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर टीम इंडिया (Team India) 6 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. पाकिस्तानच्या आजच्या विजयानंतर पॉईट्स टेबलचं समीकरण आणखीण बदलण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा :  'या' 7 संघामध्ये सेमी फायनलसाठी रस्सीखेच? जाणून घ्या समीकरण 

...तर भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये?

सर्व संघाचे चारही सामने झाले आहेत. आता निव्वळ एकच सामना उरला आहे, हा सामना येत्या 6 नोव्हेंबरला रंगणार आहे. या सामन्यावर सर्व गणिते अवलंबून असणार आहेत. टीम इंडियाने (Team India) झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकणे आवश्यक असणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर त्यांचे 5  सामन्यात 8 गुण होतील आणि ते सेमी फायनलमध्ये जातील. आणि पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकल्यास त्यांचे 5 सामन्यात 6 गुण होतील. मात्र तरीही सेमी फायनल पर्यंत पोहोचणे अवघ़ड असणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यास त्यांचे सेमी फायनलंच तिकीट कन्फर्म होणार आहे. 

टीम इंडिया 

टीम इंडिया (Team India) झिंबाब्वे विरूद्ध सामना जिंकल्यास 8 गुणांसह सेमी फायनलमध्ये जाईल. आणि जर टीम इंडिया हरली आणि पाकिस्तान जिंकल्यास रनरेट महत्वाची भूमिका बजाणार आहे. जर दक्षिण आफ्रिका नेदरलँड्सविरूद्ध हरली तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जातील.

पाकिस्तान

जर दक्षिण आफ्रिका (south africa) नेदरलँड्सविरूद्ध हरली आणि पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकल्यास तो थेट सेमी फायनलमध्ये दाखल होणार आहे. आणि जर भारत हरल्यास आणि पाकिस्तान जिंकल्यास रनरेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

दक्षिण आफ्रिका

जर दक्षिण आफ्रिका (south africa) नेदरलँड्सविरूद्ध शेवटचा सामना जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत दाखल होईल. दक्षिण आफ्रिका शेवटचा सामना हरल्यास आणि पाकिस्तानही हरल्यास आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल होईल.  

दरम्यान हे सर्व समीकरण येत्या 6 नोव्हेंबरला सुटणार आहे. या तारखेलाच हे सर्व सामने होणार आहेत. त्यामुळे आता सेमी फायनल कोणता संघ गाठतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.