नवी दिल्ली : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार्या पहिल्या टी -20 सामन्यात इंग्लिश संघाला 31 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानने इंग्लंडला 31 धावांनी पराभूत केले. या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफने शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली सामन्यात 1 रनवर खेळत होता, त्या दरम्यान त्याने पाचव्या ओव्हरच्या तिसर्या बॉलवर शॉट मारला.
This think this catch of year by Haris Rauf. #ENGvsPAK https://t.co/PYV0QqrKHg pic.twitter.com/2H4pylFxD3
— abdul basit (@basat_pyaray) July 16, 2021
रऊफ बॉल कॅच करण्यासाठी धावला, परंतु रऊफबरोबरच सोहेब मकसूदही पकडण्यासाठी धावले. रऊफने झेल घेतला परंतु तो मकसूदला आदळला. मात्र, असे असूनही त्याने चेंडू हातातून सोडला नाही. त्याचा कॅच अनेकांना आवडला. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.