पाकिस्तानच्या निर्णायक विजयानंतरही भडकला बाबर आझम; व्हिडिओ होतोय व्हायरल

Babar Azam Got Angry : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम क्वचितच रागावताना दिसतो. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेनंतर बाबर चांगलाच संतापलेला दिसत होता. त्याच्या संतापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 25, 2023, 02:59 PM IST
पाकिस्तानच्या निर्णायक विजयानंतरही भडकला बाबर आझम; व्हिडिओ होतोय व्हायरल title=

Pak vs Afg 2nd ODI : तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानवर (Afghanistan) रोमहर्षक लढतीत मात करत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेत खेळवल्या जात असलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात फक्त दोन विकेट होत्या. निर्णायक क्षणी शादाब मंकडिंगमुळे (Mankaded) पहिल्याच चेंडूवर धावबाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ अडचणीत आला होता. पण नसीम शाहने पाचव्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून विजय मिळवला. मात्र हा सामना आता कर्णधार बाबर आझममुळे (babar azam) चर्चेत आला आहे.

सामन्यादरम्यान, कर्णधा बाबर आझम चांगलाच संतापलेला दिसला. बाबरच्या संतापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'प्लेअर ऑफ द मॅच' जिंकणारा शादाब खान अंतिम षटकात 35 चेंडूत 48 धावांवर फलंदाजी करत होता आणि विजयासाठी 11 धावांची गरज होती पण पहिल्या चेंडूवर तो मंकडिंग झाला होता. त्यावेळी वेगवान गोलंदाज नसीम शाह याने दमदार फलंदाजी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

नेमकं काय घडलं?

या सामन्याच्या शेवटच्या षटकात हा सगळा राडा झाला. पाकिस्तानने 49 षटकांत 8 बाद 290 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. त्यावेळी अफगाणिस्तानचा फझलहक फारुकी गोलंदाजी करत होता. शादाबसोबत नसीम शाह क्रीजवर होता. पाकिस्तानने 49 व्या षटकात एकूण 16 धावा केल्या होत्या. त्यापैकी शादाब खानने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा काढल्या. शादाब 48 धावा करून खेळत होता. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शादाब नॉन स्ट्रायकर एंडला आणि नसीम शाह स्ट्राईकवर होता.

फझलहक फारुकीने पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन-स्ट्राइक एंडला मॅंकडिंग पद्धतीने शादाबला धावबाद केले. पाकिस्तानला इथेच आपण सामना हरलो असं वाटत होतं. मात्र त्यानंतर नसीम शाहने  दमदार खेळी करत अफगाणिस्तानला नमवलं.

शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नसीम शाहने चौकार मारून पाकिस्तानला पुन्हा एकदा सामन्यात आणलं. नसीम शाहनेही चौकार मारून सामना संपवला. सामना संपल्यानंतर जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मैदानात आला तेव्हा संतापलेला दिसत होता. त्यावेळी अफगाणिस्तानचे काही खेळाडू आणि अंपायरवर काहीतरी बोलत चांगलाच भडकला. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेहमीच शांत असणारा बाबर आझम त्याच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x