South Actor Wins Car Race in Dubai : दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार पुन्हा एकदा रेसिंगकडे वळले आहेत. इतकंच नाही तर ते 24H दुबई 2025 एंड्योरेंस रेसमध्ये सहभागी देखील झाले होते. त्यांच्या टीमनं सांगितलं की अजित कुमार रेसिंग तिथे बाजी मारत विजेतं पद स्वत: च्या नावावर केलं आहे. जिंकल्यानंतर ते विजेते ठरले आहेत आणि त्यांनी या रेसनंतर भारताचा तिरंगा फडकावून त्यांच्या विजयाचा आनंद सगळ्यांसोबत साजरा केला. त्यानंतर अनेक कलाकारांनी अजित कुमारवर गर्व होत असल्याचं म्हटलं आहे. लोकप्रिय सेलिब्रिटींनी दावा केला की त्यांना किती 'गर्व' आहे. अजित कुमार यांची स्वत: ची एक रेसिंग टीम आहे आणि त्यांच्या टीमचं नाव देकील अजित कुमार रेसिंग आहे.
अजित कुमार यांच्या टीमनं त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात एक व्हिडीओ देखील आहे. त्यात अजित कुमारसाठी दुहेरी धक्का.' 991 श्रेणीत तिसरं स्थान आणि GT4 श्रेणीत स्पिरिट ऑफ द रेस. ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या अपघातानंतर भारी असा कमबॅक आहे! #अजितकुमार #अजितकुमाररेसिंग #२४hदुबई #अॅक्रेसिंग #दुबईरेसवीकएंड #रेसिंग.”
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) January 12, 2025
जिंकल्याचं कळताच अजित कुमार त्याच्या टीमसोबत मज्जा-मस्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचे व्हिडीओवर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ शेअर करत एका व्यक्तीनं कॅप्शन दिलं की '#अजितकुमार - द मॅन पूर्ण वाईबनं विजय साजरी करतोय.' तर एका व्हिडीओत अजित कुमार हातात भारताचा तिरंगा घेऊन पवेलियनमधून बाहेर पळताना आणि तिरंगा फडकवताना दिसत आहे. चाहते त्यांच्यासाठी चीअर करताना आणि त्यांचा उत्साह पाहून अजित कुमार त्यांना फ्लाइंग किस देताना दिसत आहे.
So so proud.. what a man. The one and only. Ajith Kumar pic.twitter.com/gSDyndHv4e
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) January 12, 2025
#Ajithkumar - The Man is celebrating the success with full Vibepic.twitter.com/lPMfF3Pgej
— AmuthaBharathi (@CinemaWithAB) January 12, 2025
Congratulations my dear #AjithKumar. You made it. God bless. Love you.#AKRacing
— Rajinikanth (@rajinikanth) January 13, 2025
हेही वाचा : 'मी खूप रोमॅन्टिक आहे, माझ्या दोन्ही पत्नींना...'; आमिर खाननं मुलासमोरच सांगितलं 'मी त्या टाईपचा...'
Easily The BEST Moment Of The Celebration’s Today
Paaaaaaaah! #AjithKumarRacing | #Ajithkumar pic.twitter.com/T1iLZtVaKO
— AJITHKUMAR FANS CLUB (@ThalaAjith_FC) January 12, 2025
अजित कुमार हे या रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आर माधवननं सोशल मीडियावर अजितसोबत एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत अजित कुमार यांना आर माधवननं शुभेच्छा दिल्या. 'खूप गर्व आहे... काय माणूस आहे. वन एण्ड ओनली अजित कुमार.' वेंकट प्रभूनं लिहिलं की' शुभेच्छा अजित कुमार रेसिंग टीम.' या शिवाय रजनीकांत यांनी देखील अजित कुमार यांच्यासाठी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले की 'अजित कुमार खूप खूप शुभेच्छा. अखेर तू तिथंपर्यंत पोहोचलाच. देवाचा नेहमीच तुझ्यावर आशीर्वाद राहू देत. खूप खूप प्रेम.'