VIDEO : 'जलसा' च्या बाहेर बिग बींनी घेतली चाहत्यांची भेट, चर्चा मात्र बाल्कनित असलेल्या अभिषेकची

Abhishek - Amitabh Bachchan Video : अभिताभ बच्चन यांनी घेतली चाहत्यांची भेट, पण अभिषेकनं मिळवली लाईम लाईट...

दिक्षा पाटील | Updated: Jan 13, 2025, 01:49 PM IST
VIDEO : 'जलसा' च्या बाहेर बिग बींनी घेतली चाहत्यांची भेट, चर्चा मात्र बाल्कनित असलेल्या अभिषेकची  title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek - Amitabh Bachchan Video : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन दर रविवारी चाहत्यांना भेटतात. 'जलसा' च्या बाहेर ते काही वेळ येतात आणि तासंतास प्रतिक्षा करत असलेल्या त्यांच्या चाहत्यांना भेटतात. अनेकदा त्यांना काही भेटवस्तू देखील देतात. अनेकदा असं होतं की जेव्हा त्यांच्यासोबत कुटुंबातील काही सदस्य असतात आणि तेव्हा लाइमलाइट खेचून घेतात. कधी अगस्त्य नंदानं तर कधी नात आराध्यानं. मात्र, यावेळी सगळ्यांचं लक्ष त्यांचा मुलगा अभिषेक बच्चननं वेधलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

इन्स्टाग्रामवर व्हायर होत असलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या बंगल्याच्या गेटवर उभे होऊन चाहत्यांचे स्वागत करत असल्याचे पाहायला मिळते. त्याशिवाय हात जोडून ते सगळ्यांचे आभार मानताना दिसत आहेत. या दरम्यान, त्यांनी फक्त पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला आणि गुलाबी-काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. तर त्यांच्या डोक्यावर नेहमीप्रमाणे हेडगेयर दिसले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना रेकॉर्ड केल्यानंतर कॅमेरामननं कॅमेरा हा अभिषेक बच्चनच्या दिशेनं फिरवला. त्यात दिसून आलं की घराच्या बाल्कनीमध्ये उभ राहून अभिषेक हा त्याचे वडील अर्थात अमिताभ बच्चन आणि त्यांच्या चाहत्यांकडे पाहत होता. त्यानंतर कॅमेरा पाहिल्यानंतर अभिषेकनं देखील त्यांना हाय केलं आणि हसला. त्यानंतर तो आतमध्ये गेला. अमिताभ बच्चन जसे तिथे निघाले तसा तो देखील आत गेला. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : दाक्षिणात्य अभिनेत्यानं दुबईमधील कार रेसिंग स्पर्धा जिंकली! रजनीकांतनेही लिहिली स्पेशल पोस्ट

आता या व्हिडीओ क्लिपवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मला काय, माझ्याकडे तर ऐश्वर्या आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ऐश्वर्या कुठे आहे?' तिसरा नेटकरी म्हणाला, आता पत्नीला इथे उभ केलं असतं तर सासऱ्याला विसरले असते सगळे. आणखी एक नेटकरी म्हणाला, सगळे चाहते हे त्याच्या वडिलांचे आहेत. अभिषेकचे नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, 'अभिषेकचं असं आहे की पत्नी आणि वडील कमावतायत, मला काय घेणं देणं आहे.' हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.