Swapnil Kusale Pramotion in Central Railway : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (paris olympic) सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने कमाल करत भारताला तिसरं पदक मिळवून दिलंय. स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक (Bronze medal) पटकावलंय. त्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला 1 कोटींचं बक्षिस जाहीर झालं आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वेनं ही तिला मोठं गिफ्ट दिलंय.
Congratulations to Central Railway’s Employee Swapnil Kusale for winning bronze medal in the Men’s 50m Rifle 3 positions final for India at Paris Olympics 2024
Entire Nation and Central Railway is proud of you! #ParisOlympics2024 #SwapnilKusale #CentralRailway pic.twitter.com/wUZZscckEg
— Central Railway (@Central_Railway) August 1, 2024
खरं तर 1952 नंतर महाराष्ट्राच्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलंय. यापूर्वी खाशाबा जाधव यांना कुस्तीतील पहिलं वैयक्तिक पदक गवसलं होतं.
Central Railway honours it's Olympic medalist Mr Swapnil Kusale. In an apt recognition to his achievement in the Paris Olympics he has been promoted as Officer on Special Duty in sports cell.
Best wishes for the new role, champion. pic.twitter.com/LPURPyox2p— Central Railway (@Central_Railway) August 1, 2024
तर स्वप्नील कुसाळे हा 2015 पासून मध्य रेल्वेत तिकिट कलेक्टर म्हणून काम करतो. त्याचे वडील आणि भाऊ जिल्ह्याच्या शाळेत शिक्षक आणि आई गावची सरपंच आहे. पदकाला गवसणी घातल्यानंतर स्वप्नीलला मध्य रेल्वेने गिफ्ट दिलंय. त्याची बढती करत त्याला मुंबईतील ओएसडी, स्पोर्ट्स सेल म्हणून ( OSD, Sports Cell in Mumbai) पदोन्नती करण्यात आलीय. याबद्दल सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यासंदर्भात माहिती दिलीय.
रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीस देखील जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता स्वप्निल हा मध्य रेल्वेचा एक ऑफिसर म्हणून यापुढे काम करेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी दिलीय. तर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी स्वप्नील याचं कौतुक करीत 5 लाख रूपयांचं बक्षिस जाहीर केलंय.