WC 2023 : वानखेडे स्टेडियममध्ये हजार रुपयात पाहा वर्ल्ड कपचे सामने, सर्वात महागड्या तिकिटाची इतकी किंमत

वेस्ट इंडिज दौरा आणि पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचष स्पर्धेला सुरुवात होईल. यंदा भारतात हा स्पर्धा होणार असून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर यातील पाच सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांच्या तिकिटांचे दर मुंबई क्रिकेट असोसोएशिनच्या बैठकीत जाहीर करण्यात आले आहेत. 

Updated: Aug 1, 2023, 02:06 PM IST
WC 2023 : वानखेडे स्टेडियममध्ये हजार रुपयात पाहा वर्ल्ड कपचे सामने, सर्वात महागड्या तिकिटाची इतकी किंमत title=

ODI WC 2023 : जगभरातील क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली आहे ती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची. यंदा भारत या स्पर्धेचे आयोजन असून येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक स्पर्धा (ODI WC 2023) खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आलं आहे. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून 8 ऑक्टोबरला टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कपला (Mission World Cup) सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. तर क्रिकेट प्रेमींना ज्या सामन्याची उत्सुकता आहे तो भारत-पाकिस्तान (India vs Pakistan सामना 15 ऑक्टोबरबला रंगणार आहे. 

तिकिटांचा दर जाहीर
विश्वचषक स्पर्धेसाठी देशभरातील आठ स्टेडिअमची निवड करण्यात आली आहे. यात मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमला हा मान मिळाला आहे. आता वानखेडे मैदानावर होणाऱ्या विश्व चषकाच्या सामन्यांचे तिकिट दर जाहीर करण्यात आले असून एक हजार रुपयात क्रिकेट चाहत्यांना सामने पाहाता येणार आहेत. पण एक हजार रुपये किंमत असलेली तिकिटांची संख्या केवळ 2 हजार इतकीच आहे. त्यामुळे ही तिकिटं मिळवणारे क्रिकेट चाहते भाग्यवान ठरणार आहेत. वानखेडे स्टेडिअमवर सर्वात महागडं तिकिट 45 हजार रुपयांचं आहे. या बॉक्समध्ये सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. अन्य स्टेडिअमच्या तुलनेत वानखेडे स्टेडिअमच्या तिकिटांचे दर सर्वाधिक आहेत. 

वानखेडे स्टेडियमचे दर सर्वात महागडे
गेल्या आठवड्यात कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या तिकीटांचे दर जाहीर करण्यात आले होते. या स्टेडिअमचे दर 650 पासून 3000 रुपयांपर्यंत आहेत. तर वानखेडेच्या तिकीटांचे दर  कमीतकमी 1000 पासून 45 हजार रुपयांपर्यंत आहेत. विश्वचषक स्पर्धेची तिकिटं विकली जावीत यासाठी यंदा मुंबई क्रिकेट असोसिएशनने कोम्बो तिकिटांची ऑफर ठेवली आहे.  क्लब, संस्था, बीसीसीआय, आयसीसी आणि जाहिरातदारांना दिली जाणारी तिकीटे ही सरसकट पाच सामन्यांची असतील. म्हणजे कुणालाही एका सामन्याची तिकीट मिळणार नाहीत. सर्वच्या सर्व पाच सामन्यांची तिकीटे घ्यावी लागणार आहेत. मात्र सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी सर्व सामन्यांची तिकीटे घेणे बंधनकारक असेल की नाही, याबाबत एमसीए विचार करत आहे.  ॉ

भारताच्या सामन्याचे दर दीडपट
मुंबईतल्या वानखेडेवर मैदानावर विश्वचषकाचे एकूण पाच सामने खेळविले जाणार आहेत. पण यातील केवळ एकच सामना टीम इंडिया खेळणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा हा सामना 2 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तिकिटांचे कमीतकमी दर दीड हजार इतकं आहे. याशिवाय  15 नोव्हेंबरला खेळवल्या जाणाऱ्या सेमीफायनल तिकिटांचे दर यापेक्षाही महाग ठेवण्यात आली आहेत. 

ऑनलाईन तिकिट विक्री
विश्वचषक स्पर्धेच्या तिकिटांची विक्री कधीपासून होणार याबाबत बीसीसीआयने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. पण येत्या 10 ऑगस्टपासून तिकिट विक्रिला सुरुवात होईल अशी सुत्रांची माहिती आहे. क्रिकेट चाहत्यांना ऑनलाईन तिकिटं विकत घेता येणार आहेत.