'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न

Harbhajan Singh on BCCI: हरभजन सिंगने एका दमदार खेळाडूचे समर्थन केले असून तो टॅटू नाहीत किंवा तो फॅन्सी कपडे घालत नाही, म्हणून तुम्ही त्याला संघात घेत नाही. असे म्हणत बीसीसीआयला फटकारले आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 17, 2025, 12:31 PM IST
'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न title=

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) बीसीसीआयला (BCCI) फटकारले आहे. बोर्डाने अद्याप एका उत्तम खेळाडूला टीम इंडियात संधी न दिल्यामुळे भज्जी चिडला आहे. हा खेळाडू इतर कोणी नसून करुण नायर (Karun Nair) आहे. करुण नायरचा उत्कृष्ट फॉर्म पाहता हरभजन सिंगने भारतीय संघाच्या निवडीच्या निकषांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा 33 वर्षीय फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो सातत्याने विक्रम मोडत आहे. करुणच्या नावावर सलग ४ शतके आहेत. त्याची खेळी पाहून करुण नायरची निवड न करणे अन्यायकारक असल्याचे हरभजनने म्हटले आहे. शिवाय भज्जीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या सिनियर खेळाडूंना रणजी करंडक खेळण्यास भाग पाडले जात आहे, परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हंटले आहे. 

हरभजन सिंगने अलीकडेच नायरने दमदार कामगिरी करूनही निवडकर्त्यांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल डिटेलमध्ये सांगितले. भारताचा दुसरा तिहेरी शतकवीर बनूनही ठरल्यानंतर नायरला संघातून तीन सामन्यांत वगळल्याचा आरोपही हरभजन सिंगने केला होता. विदर्भाचा अनुभवी फलंदाज करुण नायर सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. यासह तो भारतीय क्रिकेट संघात पुनरागमनाचा मार्ग शोधत आहे. त्याची कामगिरी पाहून चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांनी बीसीसीआयला लक्ष केले आहे. हरभजन सिंगने इंग्लंडविरुद्ध निवडलेल्या संघ बघून बीसीसीआयवर टीका केली आहे.

हे ही वाचा: BCCI New Rules List: बीसीसीआय यापुढे उचलणार नाही भारतीय खेळाडूंचा 'भार', मोठ्या बदलांबाबत नवे नियम जारी

 

 

हे ही वाचा: PHOTO: 'ही' एक गोष्ट चहामध्ये टाकल्यास चहा बनतो विष, शरीराला आतून बनवतो पोकळ

काय म्हणाला हरभजन? 

हरभजन त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, "मी त्याची आकडेवारी पाहत आहे. 2024/25 मध्ये त्याने सहा डाव खेळलय, त्यामधील  पाचमध्ये तो नाबाद राहिला आणि 664 धावा केल्या. शिवाय त्याने 120 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याने करुण नायरची निवड केली नाही. हे अयोग्य आहे." 

हे ही वाचा: दुध विकले, झोपडपट्टीत राहिले...1000 रुपये उसने घेऊन बाहेर पडले आणि आज आहेत हजारो कोटींच्या मालमत्तेचे मालक

'रोहित-कोहली फॉर्मात नाहीत'- हरभजन सिंग 

हरभजन पुढे म्हणाला, " अनेक खेळाडू केवळ दोन सामन्यांच्या आधारे निवडले जातात, काहींची निवड केवळ आयपीएलच्या आधारे केली जाते. मग त्यांच्यासाठी नियम वेगळे का? रोहित आणि विराट फॉर्ममध्ये नाहीत आणि तुम्ही त्यांना रणजीमध्ये पाठवत आहात, असे लोक म्हणतात. पण जे रणजी खेळतात आणि धावा काढतात... त्यांच्याकडे दुर्लक्ष का करताय? हे खेळाडू कधी खेळणार?"