Pune Crime News : पुण्यातील अजब लग्नाची गजब चर्चा रंगली आहे. पुण्यातील येरवडा जेलमधील आरोपीचा लग्नसोहळा पार पडला. उत्तर प्रदेशात ठरलेल्या मुहूर्तावरचं आरोपीचे लग्न झाले आहे. आरोपीच्या लग्नासाठी उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. लग्नाच्या आधीच आरोपीला अटक झाली होती.
विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात आरोपी नवरदेवाला झालीय अटक झाली होती. आरोपीला लग्नासाठी आरोपीला दोन आठवड्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. शिवम राजेश तिवारी असे जामीन देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला लग्नासाठी उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी नवरदेवाला दोन आठवड्यांसाठी जामीन देण्यात आला आहे.
आरोपी शिवम राजेश तिवारी हा उत्तर प्रदेशमध्ये राहाणारा आहे. अहिलंपुर येथील तरुणीशी त्याचे लग्न ठरले होते. मात्र नवरदेव शिवम राजेश तिवारी याने खोटा विमा काढून विमा कंपनीची 1 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. मार्च 2022 ते एप्रिल 2024 दरम्यान हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात तिवारी याला 2 डिसेंबर 2024 ला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली.
16 जानेवारी 2025 ला ठरलेल्या लग्न कसं होणार असा त्यासाठी मागील काही महिन्यांपासून नवरदेव आरोपी जामीनाच्या प्रयत्नात होता. अखेर उच्च न्यायालयाने लग्नासाठी दोन आठवड्यासाठी जामीन मंजूर करण्यात केला. 16 जानेवारी 2025 ला ठरलेल्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशात आरोपीचा लग्न सोहळा पार पडला.
गुन्हा दाखल होण्यापूर्वी लग्न ठरले असल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत उच्च न्यायालयाने आरोपीला लग्नासाठी दोन आठवड्यांचा मंजूर केला. लग्नासाठी देण्यात आलेली जामीनीची मुदत संपल्यावर 28 जानेवारीला जेलमध्ये हजर होण्याचा आदेश देण्यात आले आहेत.