Rohit Sharma: No Hitman Sharma नाव ठेवं; शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितवर टीका

Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्माचा खेळ चांगला होताना दिसत नाहीये. अशातच टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी रोहितवर टीका केलीये.

सुरभि जगदीश | Updated: May 7, 2023, 11:47 PM IST
Rohit Sharma: No Hitman Sharma नाव ठेवं; शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितवर टीका title=

Rohit Sharma: शनिवारी आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) यांच्यात सामा रंगला होता. या सामन्यात देखील चेन्नईने मुंबईचा 6 विकेट्सने पराभव केला. मुंबईचा ( Mumbai Indians ) यंदाच्या सिझनमधील हा पाचवा पराभव होता. दरम्यान या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुन्हा एकदा फेल झालेला दिसला. या सामन्यात तर शून्यावर आऊट होत हिटमॅनने ( Hitman ) स्वतःच्या नावे एक नकोश्या रेकॉर्डची नोंद केलीये. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आयपीएलमध्ये आतापर्यंत तब्बल 16 वेळा शून्यावर बाद झालाय. 

यंदाच्या सिझनमध्ये रोहित शर्माला ( Rohit Sharma ) दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात चांगला स्कोर करणं शक्य झालं होतं. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 5 बॉल्समध्ये 65 रन्सची खेळी केली होती. याशिवाय 10 पैकी कोणत्याही सामन्यात त्याला अर्धशतक लगावता आलेलं नाही. त्याच्या या खेळीवरूनच टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी रोहितवर ( Rohit Sharma ) ताशेरे ओढले आहेत.

रोहित विषयी कमेंट्रीमध्ये बोलताना श्रीकांत म्हणाले की, रोहित शर्माने स्वतः नाव 'नॉट हिट शर्मा' असं ठेवलं पाहिजे. जर मी मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार असतो, तर मी त्याचा प्लेईंग 11 मध्येही समावेश केला नसता.  

दरम्यान शनिवारच्या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा खराब फॉर्मशी झुंज देतोय. अशातच सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलंय. इतंकच नाही तर त्याला अनेक टीकांचाही सामना करावा लागतोय.

मुंबईचा यंदाच्या सिझनमधील पाचवा पराभव

मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) टीमचीही यंदाच्या सिझनमध्ये काही खास कामगिरी झालेली दिसली नाही. आतापर्यंत या टीमने 10 सामने खेळले असून 5 सामन्यांतमध्ये विजय मिळवला असून 5 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची ( Mumbai Indians ) टीम सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला, हा मुंबईच्या यंदाच्या सिझनमधील पाचवा पराभव होता.