West Indies : जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक टीम असलेली (West Indies) वेस्ट इंडिज T20 World Cup मधून बाहेर पडली आहे. क्वालिफायर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने वेस्ट इंडिज सुपर 12 चा हिस्सा असणार नाही. शुक्रवारी, निकोलस पूरनचा संघ आयर्लंडशी (West Indies VS Ireland) सामना करण्यासाठी मैदानात उतरला, वेस्ट इंडिजसाठी हा करा किंवा मरो सामना होता. मात्र, अखेर वेस्ट इंडिजला सामना जिंकता आला नाही आणि वेस्ट इंडिज समर्थकांची मनं दुखावली आहेत.
निकोलस पुरन (Nicholas Puran) वेस्ट इंडिज संघाचं नेतृत्व करत होता. मात्र, वर्ल्ड कपमधून (T20 World Cup) बाहेर पडल्यानंतर त्याला अश्रू अनावर झाले. त्यावेळी त्याचा कंठ देखील दाठून आला होता. हा काळ कठीण आहे. संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. चांगल्या खेळपट्टीवर आम्ही केवळ 145 धावा केल्या तर आमच्या गोलंदाजांना सामना वाचवणं कठीण होईल. आमच्यासाठी सुरुवातीपासूनच हे आव्हान होतं, असं पुरन म्हणाला.
आयर्लंडच्या (Ireland) शानदार फलंदाजी आणि गोलंदाजीबद्दल अभिनंदन. आमच्यासाठीही काही चांगल्या गोष्टी घडल्या. जेसन होल्डर पुन्हा गोलंदाजी करत आहे, राजाने चांगली फलंदाजी केली, जोसेफही आमच्यासाठी गोलंदाजी करत आहे. हा आमच्यासाठी धडा आहे. आमच्या कामगिरीमुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. आम्ही आमच्या चाहत्यांची निराशा केली आहे. अर्थात आम्ही दु:खी आहोत. माझ्या कामगिरीने मी माझ्या सहकाऱ्यांना निराश केलं, असंही पुरन (Nicholas Puran) म्हणाला आहे.
T20 World Cup : ना शमी ना चहल, रैना म्हणतो "हा बॉलर बाबरला आऊट करणार"
दरम्यान, पोस्ट मॅच प्रझेंन्टेशनवेळी (Post match presentation) बोलताना निकोलस पुरनच्या डोळ्यात अश्रू दिसून येत होते. त्यावेळी त्याच्य़ा बोलण्यातील आवाज बदलेला दिसला. मनात निराशाची भावना आणि खराब प्रदर्शनामुळे डोळ्यात माफीची भूमिका दिसून येत होती. वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यामुळे आता T20 World Cup मधील चॅलेंज कमी झालंय, असं अनेकांचं म्हणण आहे.