नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरुवातच क्रिकेटविश्वात धमाकेदार पद्धतीने झाल्याचं पहायला मिळत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टी-२० मॅचमध्ये न्यूझीलंडच्या बॅट्समनने धमाकेदार बॅटिंग करत हाफ सेंच्युरी लगावली आहे.
न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरो याने वेस्ट इंडिजविरोधात खेळताना आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये सहावी वेगवान हाफ सेंच्युरी केली आहे.
वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात आलेल्या कॉलिन मुनरोने वेस्ट इंडिजच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला.
मुनरोने १८ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली. ही मुनरोची सर्वात वेगवान दुसरी हाफ सेंच्युरी ठरली आहे. यापुर्वी मुनरोने १४ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली होती.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराज सिंगने १२ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली होती.
मुनरोने या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. खास करुन क्रेग ब्रेथवेट आणि कोक विलियम्स यांच्या बॉलिंगवर मुनरोने रन्सचा पाऊस पाडला. मुनरोने ब्रेथवेटच्या एका ओव्हरमध्ये २१ रन्स आणि विलियम्सच्या एका ओव्हरमध्ये २४ रन्स केले.
या मॅचमध्ये मुनरोने २३ बॉल्समध्ये ६६ रन्स केले. या इनिंगमध्ये मुनरोने ११ फोर आणि ३ सिक्सर लगावले. मात्र, विलियम्सने शेवटी मुनरोची विकेट घेतली.
कॉलिन मुनरो आणि जानेवारी यांच्यात एक खास कनेक्शन आहे. हे सलग तिसरं वर्ष आहे ज्यावेळी कॉलिन मुनरोने आपल्या बॅटिंगने चमत्कार घडवला आहे. यापूर्वी १० जानेवरी २०१६ रोजी श्रीलंकेविरोधात मुनरोने १४ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली होती.
६ जानेवारी २०१७ रोजी कॉलिन मुनरोने बांगलादेशविरोधात ५४ बॉल्समध्ये १०१ रन्स केले. आता १ जानेवारी २०१८ रोजी मुनरोने वेस्ट इंडिजविरोधात खेळताना १८ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली.