नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक किस्से घडतात. कधी मैदानात वाद होतो तर कधी शिवीगाळ होते. कुणी कॅच आऊट होतं तर कुणी रन आऊट होतं. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला हसून-हसून तुमच्या पोटात दुखेल.
एका स्थानिक सामन्यात एक बॅट्समन रन आऊट झाला. या रन आऊटचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्या मागचं कारणंही तसंच आहे.
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर नील वॅगनरने एक असा रन आऊट केला आहे ज्यानंतर सर्वांनी त्यावर टीका केली. तर, काहींनी याला खेळाच्या भावनांविरोधात असल्याचं म्हटलं.
नील वॅगनरनने एका मॅचमध्ये ओटैगोसाठी खेळताना टिम जॉन्सटन याला शॉर्ट बॉल टाकला. हा बॉल बॅट्समन जॉन्सटनने बाऊंसर समजला आणि डक केला.
यानंतर ज्याप्रकारे नील वॅगनरने बॅट्समनला आऊट केलं तो रन आऊट पाहण्यासारखा आहे. बाऊंसर टाकल्यानंतर वॅगनर फॉलो-थ्रूमध्ये पळत आला आणि बॅट्समनला आऊट केलं.
Cheeky stuff from Neil Wagner. pic.twitter.com/xQ6fbJgPQs
— Divya Reddy (@Kohlicious_) October 24, 2017
यावेळी बॅट्समन हा क्रीजपासून काही अंतर दूर होता. व्हिडिओत पाहू शकतो, असं वाटत आहे की वॅगनरन बॅट्समनसमोर येतो आणि तो बॉल उचलून माघारी परतेल. पण वॅगनरनने संधी साधत बॅट्समनला रन आऊट केलं.