दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू 'या' प्रकरणात आढळला दोषी, कोर्टाने दिला आदेश!

Kathmandu District Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 29, 2023, 07:27 PM IST
दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू 'या' प्रकरणात आढळला दोषी, कोर्टाने दिला आदेश! title=
Sandeep Lamichhane

Sandeep Lamichhane found guilty : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने (Kathmandu District Court) शुक्रवारी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. पुढील सुनावणीत संदीप लामिछाने याला तुरुंगवासाची शिक्षा निश्चित केली जाईल, अशी माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे. अंतिम सुनावणीच्या समाप्तीनंतर न्यायाधीश शिशिर राज ढकल यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश दिला. आरोपी लामिछाने याने 21 ऑगस्टच्या रात्री 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. जिल्हा न्यायालयाने 7 सप्टेंबर रोजी लामिछाने याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर त्याने स्वतः शरण येण्याचा निर्णय घेतला. मागील काही दिवस तो जामीनावर बाहेर होता. मात्र, आता त्याला कोर्टाने दोषी ठरवलं होतं.

संदीपवर काय आहेत आरोप?

संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) एका 17 वर्षाच्या मुलीला काठमांडू आणि भक्तीपूरमध्ये घेऊन गेला. त्यावेळी त्यानं काठमांडूतील सिनामंगल येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रकरण आणखीन चिघळल्यानंतर संदीपला नेपाळ क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. यावेळी लामिछाने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. या लीगमध्येही तो त्याच्या संघातून बाहेर काढण्यात आलंय.

संदीप नेपाळचा स्टार खेळाडू आहे. जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळणारा तो देशातील एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप नेपाळचा पहिला क्रिकेटपटूही ठरला आहे. यासह, तो ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि लंकन प्रीमियर लीगसह अनेक लीगमध्ये खेळला आहे. 2018 मध्ये संदीपला पहिल्यांदा ओळख मिळाली, जेव्हा तो पहिल्यांदा IPL खेळला होता. संदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सने (DD) 20 लाख रुपयांना विकत घेतलं होतं.

दरम्यान, लीगमधून बाहेर निघाल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) जोरदार टीका सुरू झाली. त्यावेळी तो परदेशात होता. वारं आपल्या विरोधात असल्याचं पाहून त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. काठमांडू विमानतळावर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती.