Wrestlers Protest: विराट-रोहितची हातावर घडी तोंडावर बोट, पण 'या' क्रिकेटर्सने थोपटले दंड!

Wrestlers Protest On Jantar Mantar: टीम इंडियाचे खेळाडू बोलत का नाहीत? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिनच्या भूमिकेवर सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसत आहे.

सौरभ तळेकर | Updated: Apr 29, 2023, 09:00 PM IST
Wrestlers Protest: विराट-रोहितची हातावर घडी तोंडावर बोट, पण 'या' क्रिकेटर्सने थोपटले दंड! title=
Neither Virat nor Rohit Kapil Dev Harbhajan SinghVirender Sehwag and Irfan Pathan React On Jantar Mantar Wrestlers Protest

Indian Cricketer Reaction On Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात महिला कुस्तीगिरांनी दंड थोपटले आहेत. गेली काही दिवस दिल्लीच्या जंतर मंतर (Jantar Mantar) येथे आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे सध्या देशभर एकच चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. ब्रिजभूषण सिंह यांना अटक (Arrest Brij Bhushan) करण्याची मागणी केली जात आहे, त्यामुळे दिल्लीत चांगलंच वातावरण पेटलंय. अशातच कुस्तीगिरांच्या या आंदोलनाला अनेकांचा सपोर्ट मिळत असल्याचं दिसतंय. अशातच पैलवान विनेश फोगाटने (Vinesh Phogat) एक वक्तव्य केलं अन् अनेक क्रिकटर्सचे डोळे उघडले आहेत.

मला क्रिकेटपटू आणि दुसरे दिग्गज खेळाडू सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवत नाहीत, हे पाहून खूप दुःख झालं, असं विनेश फोगाट (Vinesh Phogat) म्हणाली होती. त्यानंतर आता क्रिकेटर्स देखील कुस्तीगिरांच्या आंदोलनाला समर्थन देताना दिसत आहेत. कपिल देव (Kapil Dev), हरभजन सिंग (Harbhajan Singh), वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी समोर येत आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

काय म्हणाला इरफान पठाण?

भारतीय खेळाडू फक्त ते पदक जिंकतात तेव्हाच नाही तर कायम आपल्यासाठी गौरवशाली असतात, असं इरफान पठाण  (Irfan Pathan)  म्हणतो.

भज्जी म्हणतो...

साक्षी, विनेश हे भारताची शान आहेत. एक खेळाडू म्हणून आपल्या देशाचा अभिमान रस्त्यावर उतरून निषेध नोंदवताना मला वेदना होत आहेत. त्यांना न्याय मिळावा अशी मी प्रार्थना करतो, असं ट्विट हरभजनने  (Harbhajan Singh) केलंय.

कपील देव म्हणतात...

इरफान, हरभजनसह कपिल देव यांनी देखील आंदोलनाला समर्थन दिलंय. त्यांना कधी न्याय मिळेल का? असा सवाल कपिल देव (Kapil Dev) उपस्थित करतात.

आणखी वाचा - भारतीय क्रिकेटपटू गप्प का? आमची इतकी ही लायकी नाही का? कुस्तीपटू विनेश फोगाटचा संतप्त सवाल

सेहवाग म्हणतो दुःखदायक 

देशाला गौरव मिळवून देणाऱ्या, ध्वज फडकवणाऱ्या आणि आपल्या सर्वांसाठी एवढा आनंद देणार्‍या आपल्या चॅम्पियन्सना आज रस्त्यावर यावं लागत आहे, हे खूप दुःखदायक आहे. ही अत्यंत संवेदनशील बाब असून त्याची निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. खेळाडूंना न्याय मिळेल अशी आशा आहे, असं सेहवाग (Virender Sehwag) म्हणतो.

दरम्यान,  राजकीय नेते तसेच कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राची देखील साथ मिळाली आहे. मात्र, टीम इंडियाचे खेळाडू बोलत का नाहीत? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिनच्या भूमिकेवर सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसत आहे. तर दुसरीकडे या महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे बेशिस्तपणाचे असून त्यामुळे भारताची प्रतिमा खराब होतेय, असं म्हणणाऱ्या पी.टी. उषा (PT Usha) देखील ट्रोल होताना दिसत आहेत.