नागपूरमध्ये कोहलीची 'विराट' इनिंग, पाचवी डबल सेंच्युरी

 विराट कोहलीच्या क्रिकेट करिअरमधील ही पाचवी डबल सेंच्युरी आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2017, 03:28 PM IST
नागपूरमध्ये कोहलीची 'विराट' इनिंग, पाचवी डबल सेंच्युरी title=

नागपूर : नागपूर कसोटीमध्ये कोहलीने डबल सेंच्युरी केली आहे. विराट कोहलीच्या क्रिकेट करिअरमधील ही पाचवी डबल सेंच्युरी आहे. 

सेंच्युरीचाही रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय करिअरमधील ५१वी सेंच्युरी लगावली. विराटने १३० बॉल्समध्ये १० फोर लगावत सेंच्युरी केली. कॅप्टन म्हणून सर्वाधिक ११ सेंच्युरी सुनील गावस्कर यांच्या नावावर होत्या.

गावस्करांच्या या रेकॉर्डची बरोबरी विराटने कोलकाता टेस्ट मॅचमध्ये केली होती. मात्र, आता नागपूर टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एक सेंच्युरी लगावत विराटने गावस्करांनाही मागे टाकलं आहे.

या लिस्टमध्ये विराट, गावस्कर यांच्यानंतर नाव आहे ते म्हणजे मोहम्मद अझहरुद्दीन यांचं. अझहरुद्दीन यांनी कॅप्टन असताना ९ टेस्ट सेंच्युरी केल्या आहेत.