Ranji Trophy : लॉर्ड ठाकूरच्या 'बेझबॉल'ने मुंबई तारली, तामिळनाडूचा पराभव करत मिळालं फायनलचं तिकीट!

Mumbai In Ranji Trophy final : रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने बीकेसी मैदानावर तामिळनाडूचा (Mumbai vs Tamil Nadu) एक डाव आणि 70 धावांनी पराभव करून विक्रमी 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

सौरभ तळेकर | Updated: Mar 4, 2024, 04:41 PM IST
Ranji Trophy : लॉर्ड ठाकूरच्या 'बेझबॉल'ने मुंबई तारली, तामिळनाडूचा पराभव करत मिळालं फायनलचं तिकीट! title=
Mumbai In Ranji Trophy final

Mumbai vs Tamil Nadu : रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने बीकेसी मैदानावर तामिळनाडूचा (Mumbai In Ranji Trophy final) एक डाव आणि 70 धावांनी पराभव करून विक्रमी 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शार्दुल ठाकूरच्या ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर मुंबईने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. शार्दूलने 104 चेंडूंत 13 चौकार आणि 4 षटकारासह 109 धावांची बेझबॉल खेळी केली. तर गोलंदाजी करत असताना त्याने 4 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मुंबईसाठी लॉर्ड ठरला आहे. 

तामिळनाडूच्या पहिल्या डावातील 146 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईने 378 धावा केल्या होत्या. त्यामुळे मुंबईला 232 धावांची लीड मिळाली. मात्र, तामिळनाडूचा दुसरा डाव 162 धावांवर मुंबईने गुंडाळला. त्यामुळे मोठ्या फरकाने तमिळनाडूचा पराभव करत मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

तामिळनाडूच्या पहिल्या डावात विजय शंकरने 44 धावांची संयमी खेळी केली. 109 बॉलचा सामना त्याने केला. तर वॉशिंग्टन सुंदर याने 43 धावा करत तामिळनाडूची लाज राखली. तर मुंबईकडून तुषार देशपांडे याने तीन विकेट्स तर तनुष कोटियन याने दोन गडी मोकळे केले. तनुष कोटियन याने मुंबईच्या फलंदाजीवेळी देखील चमक दाखवली. त्याने 89 धावांची मोठी खेळी केली. तर शार्दुलने शतक ठोकलं. 

मुंबईला 232 धावांची लीड मिळाल्याने तामिळनाडूच्या फलंदाजीची कस निघाला. बाबा इंद्रजीथ आणि प्रदोष पॉल यांनी तामिळनाडूला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाबा इंद्रजीथ 70 धावा करून बाद झाल्यानंतर तामिळनाडूच्या आशा मावळल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूर याने 2 विकेट्स तर शम्स मुलाणी याने 4 विकेट्स खोलल्या. त्यामुळे मुंबईला अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीमध्ये मोठा विजय मिळवता आला आहे.

मुंबई प्लेईंग ईलेव्हन - अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.

तामिळनाडू प्लेईंग ईलेव्हन - रविश्रीनिवासन साई किशोर (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, बाबा इंद्रजीथ, प्रदोष पॉल, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजित राम, संदीप वॉरियर आणि कुलदीप सेन.