Sunil Gavaskar On Jasprit Bumrah : धर्मशाला येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी (IND vs ENG 5th Test) सामन्यासाठी आता टीम इंडियाने कंबर कसली आहे. बीसीसीआयने नुकतीच टीम इंडियाच्या स्कॉडची घोषणा केली. यानुसार आता पाचव्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) पुनरागमन झालं आहे. चौथ्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला होता. आता बुमराह पाचव्या सामन्यात पुन्हा आग ओकणार हे निश्चित झालंय. अशातच आता टीम इंडियाचे ज्येष्ठ माजी खेळाडू लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी जसप्रीत बुमराहचे कान टोचले आहेत.
काय म्हणाले सुनील गावस्कर?
राजकोटमधील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात बुमराहने केवळ 15 ओव्हर टाकल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात आठ ओव्हर तरी, प्रशिक्षकाच्या सूचनेनुसार बुमराहला रांचीसाठी विश्रांती देण्यात आली होती. दुसरा कसोटी सामना आणि तिसरा कसोटी सामना यामध्ये नऊ दिवसांचा ब्रेक होता हे विसरू नका आणि त्यानंतर संपूर्ण सामन्यात 23 ओव्हर टाकणं अजिबात थकवणारं नाही, मग बुमराहला विश्रांती का देण्यात आली? असा खडा सवाल सुनील गावस्कर यांनी विचारला आहे.
बुमराहला विश्रांती देणं टीम इंडियाच्या हिताचं नव्हतं. कारण चौथा कसोटी सामना खूप महत्त्वाचा होता. इंग्लंडने तो जिंकला असता तर शेवटचा कसोटी सामना निर्णायक ठरला असता. आकाश दीपने उत्कृष्ट गोलंदाजी केली. मोठी नावं खेळली नाहीत तरी काही फरक पडत नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. त्यामुळे युवा खेळाडू नेहमी प्रभावी ठरतात, असंही गावस्कर म्हणाले आहेत.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 :
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियाचा स्कॉड
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.