Mumbai Indians : प्लेऑफ गाठणं मुंबईसाठी कठीण; रोहित शर्मा समोर उभी मोठी अडचण

Mumbai Indians vs SRH: प्लेऑफ गाठण्याचे सर्व दरवाजे मुंबईसाठी अजूनही पूर्णपणे बंद झालेले नाहीत. मात्र हा मार्ग मुंबईसाठी काही प्रमाणात कठीण असल्याचं मानलं जातंय. अशातच कर्णधार रोहित शर्मा  ( Rohit sharma ) समोरची एक अचडण दूर होण्याचं नाव घेत नाहीये. 

Updated: May 20, 2023, 04:24 PM IST
Mumbai Indians : प्लेऑफ गाठणं मुंबईसाठी कठीण; रोहित शर्मा समोर उभी मोठी अडचण title=

Mumbai Indians vs SRH: शुक्रवारी राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) विरूद्ध पंजाब किंग्स ( Punjab Kings ) यांच्यात सामना रंगला होता. राजस्थानने हा सामना जिंकल्यानंतर राजस्थानने पॉईंट्स टेबलमध्ये पाचवं स्थान पटकावलं. यामुळे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) पॉईंट्स टेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर आली असून त्यांचा प्लेऑफ गाठण्याचा मार्ग खडतर मानला जातोय. दरम्यान प्लेऑफ गाठण्याचे सर्व दरवाजे मुंबईसाठी बंद झालेले नाहीत. 

मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) पुढचा सामना रविवारी म्हणजेच 21 मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना मुंबईने जिंकला तर रोहित सेनेकडे प्लेऑफ गाठण्याची संधी आहे. हैदराबाद पहिल्यांदाच प्लेऑफच्या बाहेर गेली असून या टीमला विजय किंवा पराभवाने फायदा होणार नाहीये. मात्र जरी हा सामना जिंकायचा असला तरी कर्णधार रोहित शर्मा  ( Rohit sharma ) समोरची एक अचडण दूर होण्याचं नाव घेत नाहीये. 

रोहित शर्मासमोर गोलंदाजीची समस्या

मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी चिंता म्हणजे टीमची गोलंदाजी. मुंबईच्या विरूद्ध गेल्या 4 सामन्यांमध्ये विरोधी टीमने 200 पेक्षा अधिक रन्स केले आहेत. मुंबईने यंदाच्या सिझनमध्ये अनेक सामन्यांमध्ये डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजी केली. या खराब गोलंदाजीमुळे मुंबईने काही सामने जिंकावे लागले आहेत. 

वानखेडेमध्ये मुंबईची कामगिरी कशी?

यंदाच्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमची कामगिरी वानखेडेच्या स्टेडियममध्ये चांगली झालेली दिसून आली. या स्टेडियमवर मुंबईने आतापर्यंत 4 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामना देखील याच मैदानावर होणार असून हा सामना जिंकून रन रेट वाढवण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्सची टीम करणार आहे. हा सामना जिंकला तर मुंबईच्या खात्यात एकूण 16 पॉईंट्स होणार आहेत. 

रोहित शर्माचा फॉर्म देखील चिंतेची बाब

गेल्या काही सामन्यांपासून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा देखील फॉर्ममध्ये दिसून येत नाहीये. सलग दोन सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाल्याने त्याचा फॉर्म देखील चिंतेचा विषय ठरतोय. गेल्या 2 सामन्यांमध्ये त्याने 29 आणि 37 रन्स केले आहे. त्यामुळे आता प्लेऑफ गाठण्यासाठी रविवारच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करण्यात येतेय.