मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम मुंबई टीमसाठी काही फार चांगला राहिला नाही. 5 ट्रॉफी मिळवणारी टीम पंधराव्या हंगामात साधे 5 सामने सोडा पण 8 पैकी एकही सामना जिंकू शकली नाही. लखनऊ विरुद्ध 36 धावांनी मुंबईला आपला आठवा पराभव स्वीकारण्याची वेळ आली.
मुंबई टीम प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर झाली आहे. मुंबईच्या फलंदाजांची अत्यंत लाजीरवाणी कामगिरी राहिली आहे. मुंबईने आपल्या नावावर 2 नकोशा रेकॉर्डची नोंदही केली. कॅप्टन रोहित शर्मा टीममधील 3 खेळाडूंना कधीच माफ करणार नाही. इतकच नाही तर पुढच्यावेळीही संधी देईल की नाही याबाबतही शंका आहे.
1. ईशान किशन
आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून ईशान किशनवर बोली लावून मुंबई टीममध्ये घेण्यात आलं. पण ईशान पहिल्या सामन्यापासून सतत फ्लॉप कामगिरी करताना दिसला. ईशानच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत.
ओपनिंगला उतरून चांगल्या धावा काढण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे मधल्या फळीवर खूप मोठा दबाव आला. त्यामुळे मधल्या खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली नाही. पंधराव्या हंगामात 8 सामन्यांमध्ये मिळून ईशाननं 199 धावा केल्या आहेत. पुढच्या मॅचमध्ये ईशानला टीममधून बाहेर बसवलं जाण्याची शक्यता आहे.
2. जयदेव उनादकट
जयदेव उनाकटने अत्यंत वाईट कामगिरी केली आहे. जयदेवच्या बॉलिंगवर विरोधी टीमच्या फलंदाजांनी मजबूत धावा काढल्या. जयदेवनं टाकलेल्या बॉलवर एकापेक्षा एक शॉट खेळण्यात विरोधी टीमला यश मिळालं. याचा फटका मुंबईला बसला.
लखनऊ विरुद्धच्या सामन्यात देखील जयदेवने 4 ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या. त्याला एकही विकेट काढता आली नाही. के एल राहुलच्या एका शॉटवर जयदेवला दुखापत होता होता टळली. जयदेवनेही यंदाच्या 8 सामन्यात म्हणावी तेवढी चांगली कामगिरी केल्याचं दिसलं नाही.
3. रिले मेडेरिथ
रिले मेडेरिथ सर्वात महागडा खेळाडू म्हणून सिद्ध झाला. त्याच्या ओव्हर्समध्ये खूप धावा विरोधी टीमला दिल्या. 4 ओव्हरमध्ये 40 धावा लखनऊने दिल्या. बुमराहला त्याची साथ चांगली मिळाली नाही. त्यामुळे विरोधी टीमला जास्त धावा गेल्या. याचा तोटा मुंबई टीमला झाला.