MI vs KKR: कॅप्टन बदलताच मुंबईचं नशिब बदललं; 5 विकेट्सने कोलकाताला चारली धूळ!

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या मुंबई इंडियन्सने कोलकाताला 5 गडी राखून धूळ चारली आहे. हा सामना जिंकताच मुंबईने आपल्या खात्यात आणखी दोन अंक जमा केले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 अंकासह अंकतालिकेच्या वरच्या स्थानी पोहोचली आहे. 

Updated: Apr 16, 2023, 07:31 PM IST
MI vs KKR: कॅप्टन बदलताच मुंबईचं नशिब बदललं; 5 विकेट्सने कोलकाताला चारली धूळ!  title=
MI vs KKR IPL 2023

MI vs KKR IPL 2023: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या मुंबई इंडियन्सने कोलकाताला 5 गडी राखून धूळ चारली आहे. हा सामना जिंकताच मुंबईने आपल्या खात्यात आणखी दोन अंक जमा केले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 अंकासह अंकतालिकेच्या वरच्या स्थानी पोहोचली आहे. 

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्ससमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले होतं. त्याला पाठलाग करताना मुंबई धुंवाधार सुरूवात केली. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीला आला. तर इशानने आक्रमक खेळी करत 58 धावा केल्या. तर कॅप्टन सूर्यकुमार यादवने 18 बॉलमध्ये 33 धावांची खेळी करत मुंबईला विजय नोंदवून दिलाय. तर तिलक वर्माने 30 धावा करत मुंबईची नौका पार केली.

त्याआधी, रहमानउल्ला गुरबाज आणि एन जगदीसनने कोलकाताच्या बॅटिंगला सुरवात केली. पण एन जगदीसन 0 रन्सवर बाद झाला आणि व्यंकटेश अय्यर बॅटिंगला आला व्यंकटेश अय्यरने फलंदाजीला दमदार सुरवात केली. एका बाजूला विकेट्स पडत होत्या पण व्यंकटेश अय्यरची फलंदाजी सुरूच होती. रहमानउल्ला गुरबाजने  8 रन्स करत विकेट गमावली आणि कर्णधार नितीश राणा बॅटिंगला आला. व्यंकटेश अय्यरची फलंदाजी सुरूच होती व्यंकटेश अय्यरने त्याच अर्दशतक पूर्ण केल. 

आणखी वाचा - MI vs KKR: Live सामन्यात राडा; Nitish Rana आणि Hrithik Shokeen भिडले, पाहा Video

काही वेळातचं  नितीश राणाने विकेट गमावली आणि शार्दूल ठाकूर फलंदाजीला आला शार्दूल आणि व्यंकटेशने फलंदाजीची गती सुरूच ठेवली पण शार्दूल ठाकूर आऊट झाला आणि रिंकू सिंग बॅटिंगला आला.  व्यंकटेश अय्यरने दमदार फलंदाजी सुरूच ठेवली पण एका बाजूला कोलकाताला धक्के सुरूच होते रिंकू सिंगने 18 रन करून विकेट गमावली आणि आंद्रे रसेल बॅटिंगला आला व्यंकटेश अय्यरने 50 बॉल्समध्ये शतक पूर्ण केलं .

दरम्यान, 104 रनवर व्यंकटेश अय्यरने विकेट गमावली त्यानंतर आंद्रे रसेल आणि सुनील नरेनने कोलकाताची इनिंग्स पुढे चालवत राहिले आणि 20 ओव्हरमध्ये कोलकाताने मुंबई समोर 186 धावांचं आव्हान उभा केलं होतं. त्याला मुंबईने 14 चेंडू राखून पार केलं.