धोनीमुळे साक्षीला 'या' गोष्टीचा होतो त्रास, मीडियासमोर दिली कबुली

धोनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. परंतु आता तो चर्चेत आहे तो, त्याच्या बायकोमुळे.

Updated: Mar 17, 2022, 08:16 PM IST
धोनीमुळे साक्षीला 'या' गोष्टीचा होतो त्रास, मीडियासमोर दिली कबुली title=

मुंबई : महेंद्र सिंग धोनी या नावाला कोण ओळखत नाही. टीम इंडियाला अनेक ट्रॉफी मिळवून देण्यात धोनीचा खूप मोठ हात आहे. धोनीला क्रिकेटची नस-नस ओळखता येते असे म्हटले जाते आणि हे खरे देखील आहे. कारण धोनीने ज्या खेळाडूंना आपला सल्ला दिला आहे. त्यामुळे त्या खेळाडूचा किंवा त्या व्यक्तीचा फायदाच झाला आहे. आता धोनी क्रिकेटमधून रिटायर झाला असला, तरी क्रिकेटशी असलेलं त्याचं नातं कधीही संपणार नाही. धोनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. सध्या तो सिनेमात पदार्पण करणार असल्याची देखील चर्चा होत आहे. परंतु या सगळ्यात धोनी चर्चेत आला आहे. ती त्याची बायको साक्षीमुळे.

साक्षीने हल्लीच मीडियासमोर एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे धोनी चर्चेत आला आहे.

साक्षीने एका मुलाखतीत सांगितले की, 'धोनीमुळे आता मला देखील प्रायव्हसी मिळत नाही. कुठेही गेलं तरी लोकं आम्हाला घेरतात. आम्ही कुठेही जातो, तेव्हा कॅमेरा असतोच. तसेच लोक आम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात. ज्याचा आता मला कंटाळा आला आहे. मला आता या सगळ्याचा फारच कंटाळा आला आहे.'

धोनीची बायको साक्षी आपल्याला त्याच्यासोबत नेहमीच दिसते. एवढंच काय तर अनेक वेळा विजयाचा जल्लोष करताना देखील साक्षी धोनीबरोबर असल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. त्यामुळे साक्षीही धोनीच्या किती जवळ आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल.

त्यात सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांच्या आयुष्यातील किंवा जवळच्या व्यक्तींसंबंधीत जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडते. ज्यामुळे लोक सेलिब्रिटी कुठेही दिलसे तरी, घेराव घातात आणि प्रश्न विचारु लागतात किंवा फोटो खेचतात आणि हे सहाजिकच आहे.

परंतु धोनीमुळे मिळत असलेल्या या पब्लिसीटीमुळे प्रायव्हसी कुठेतरी संपली आहे असं साक्षीला वाटत आहे. ज्याचा आता तिला राग आणि कंटाळा दोन्ही येतोय.