IPL 2023 MS Dhoni: प्लेऑफ असो की लीग स्टेजचे सामने यंदाच्या हंगामात चेन्नईचे 16 च्या 16 सामने 'धोनीमय' झाले. विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर जरी सामना असला तरी गर्दी मात्र धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) फॅन्सीची असायची. धोनीने फॅन्सची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर मात्र सोडली नाही. थाला मैदानात आला की एकच जल्लोष... सर्वांच्या तोंडावर नाव असायचं धोनी.. धोनी.., अखेर माहीचा हा प्रवास थंडावला. आयपीएलची फायनल (IPL 2023 Final) दिमाखात जिंकली आणि पुढल्या वर्षी पुन्हा दिसणार, असे संकेत देऊन धोनी आता आपल्या वाटेने निघालाय.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात एक ड्राईव्ह मारताना धोनीचा तोल थोडा हुलका आणि धोनीच्या गुडघ्यांना मार (MS Dhoni Injury) बसला. विकेटकिपिंग करत असताना ही घटना घडली होती. तरी देखील कोणतीही नाराजी चेहऱ्यावर न दिसून देता धोनी पुन्हा मैदानात आला अन् एकामागोमाग एक विजयाचा सपाटा लावला. धोनी पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल अनेकांना पडला होता. त्याला कारण होतं धोनीच्या गुडघ्यांवर सतत बांधला गेलेला आईसपॅक.
सराव सामन्यात धोनी गुडघ्यावर आईसपॅक लावून मैदानात उतरायचा. त्यामुळे धोनीच्या फिटनेसवर (MS Dhoni Fitness) अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अशातच आता चेन्नईच्या चाहत्यांसाठी निराशाजनक माहिती समोर आली आहे. धोनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. Ravsportz ने दिलेल्या माहितीनुसार, धोनीला या आठवड्याच्या अखेरीस कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल दाखल केले जाऊ शकतं. त्यावेळी धोनीच्या गुडघ्याबाबत काही चाचण्या होऊ शकतात. यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.
आणखी वाचा - Ajinkya Rahane: ना सुपला ना झोपला, टेक्निकच्या जोरावर अज्जूने अखेर कलंक मिटवलाच!
दरम्यान, माझ्यासाठी 'थँक्यू सो मच' म्हणणं सोपं आहे, परंतु माझ्यासाठी कठीण गोष्ट म्हणजे आणखी 9 महिने कठोर परिश्रम करणं आणि परत येऊन IPL चा आणखी 1 हंगाम खेळणं. चाहत्यांनी ज्याप्रकारे त्यांचे प्रेम आणि आपुलकी दाखवली आहे, मला वाटतं की त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, असं म्हणत धोनीने आगामी 6 ते 7 महिन्यात आयपीएलला टाटा गुड बाय (MS Dhoni Retirement) करण्याचे संकेत दिले आहेत.