T20 WC Ind Vs Aus: "डेथ ओव्हर शमीला देणं...", विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गणित

टी 20 सुपर 12 फेरीच्या सामन्यापूर्वी भारताने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. सराव सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 6 धावांनी पराभूत केलं. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर भारताचं डेथ ओव्हरचं टेन्शन मोहम्मद शमीमुळे संपल्याचं दिसत आहे.

Updated: Oct 17, 2022, 02:20 PM IST
T20 WC Ind Vs Aus: "डेथ ओव्हर शमीला देणं...", विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गणित title=
Photo- BCCI Twitter

T20 World Cup 2022 Warm Up Match India Vs Australia: टी 20 सुपर 12 फेरीच्या सामन्यापूर्वी भारताने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. सराव सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 6 धावांनी पराभूत केलं. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर भारताचं डेथ ओव्हरचं टेन्शन मोहम्मद शमीमुळे संपल्याचं दिसत आहे. शेवटच्या षटकात 11 धावांची आवश्यकता होती. मोहम्मद शमीने 4 धावा दिल्या आणि 4 गडी बाद केले. यानंतर कर्णधार रोहित शर्मानं टीम इंडिया आणि मोहम्मद शमीचं कौतुक केलं आहे.

"आम्ही चांगली फलंदाजी केली, शेवटच्या षटकात आम्ही आणखी 10-15 धावा शकलो असतो. आम्हाला शेवटपर्यंत तग धरून राहायचं होतं जे सूर्याने केले. ही चांगली खेळपट्टी होती आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मोठ्या फटकेबाजीसह सावध खेळी करणंही गरजेचं आहे. त्यासाठी एका षटकात 8-9 जमा करण्यासाठी एकेरी आणि डबल धावा करणं तितकेच महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीने आमच्यावर दडपण आणले. डेथ ओव्हर शमीला देणं चांगला निर्णय ठरला. हा निर्णय शमीने सार्थकी लावला.", असं भारतीय कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं.

T20 WC: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा विजय, शमीची भेदक गोलंदाजी

वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी असणार आहे.

भारतीय संघ- केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर. अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, दीपक हुड्डा