T20 World Cup 2022 Scotland Vs West Indies: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा ग्रुप स्टेजमधील सामन्यानंतर रंगतदार वळणावर येत आहे. ग्रुप स्टेज फेरीत आतापर्यंत दोन मोठे उलटफेर क्रीडाप्रेमींना अनुभवता आले. ग्रुप स्टेज ए मध्ये नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता स्कॉटलँडनं वेस्ट इंडिजला पराभूत ग्रुप स्टेज बी गटात मोठा उलटफेर केला आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या स्कॉटलँड संघाने 20 षटकात 5 गडी गमवून 160 धावा केल्या आणि विजयासाठी 161 धावांचं आव्हान ठेवलं. विजयी आव्हान गाठताना वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी ढेपाळली. वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात सर्वबाद 118 इतक्या धावा करू शकला. स्कॉटलँडने वेस्ट इंडिजवर 42 धावांनी विजय मिळवला.
स्कॉटलँडचा डाव
सलामीला आलेल्या जॉर्ज मुन्से आणि मायकल जोन्स जोडीनं पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात जेसन होल्डरला यश आलं. मायकल जोन्स त्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 17 चेंडूत 20 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मॅथ्यू क्रॉस तग धरू शकला नाही. अवघ्या 3 धावा करून बाद झाला. पण संघाची एक बाजू जॉर्ज मुन्सेनं धरून ठेवली होती. कॅलम मॅकलॉड 23 धावा, मायकल लीक्स 4 धावा करून तंबूत परतले. जॉर्ज मुन्सेनं 53 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. या खेळीत 9 चौकारांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत मार्क वॅटनं 3, ब्रॅड व्हीलनं 2, मायकल लीक्सनं 2, सफियान शरीफ आणि जोश डॅवेनं प्रत्येकी 1 गडी बाद केला.
T20 WC: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा विजय, शमीची भेदक गोलंदाजी
स्कॉटलँड संघ- जॉर्ज मुन्से, मायकल जोन्स, मॅथ्यू क्रॉस, रिची बेरिंगटन, कॅलम मॅकलॉड, मायकल लीक्स, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वॅट, जोश डॅवे, सॅफयान शरीफ, ब्रॅड व्हील
वेस्ट इंडिज संघ- कायल मायर्स, इव्हीन लेव्हीस, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शारमार्ह ब्रूक्स, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल होसेन, अलझरी जोसेफ, ओडिन स्मिथ, ओबेड मॅककॉय