IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठा अपघात टळला, दोन क्रिकेटपटू थोडक्यात बचावले

GT vs MI IPL 2023: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. त्याआधी मैदानावर एक मोठा अपघात टळला. टीम इंडियाचे दोन खेळाडू जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले

Bollywood Life | Updated: Apr 24, 2023, 09:43 PM IST
IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठा अपघात टळला, दोन क्रिकेटपटू थोडक्यात बचावले title=

GT vs MI IPL 2023 Match: आयपीएलच्या सोळाव्या हंगामातला 35 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्सदरम्यान (Gujrat Titans) खेळला जाणार आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) हा सामना रंगणार असून दोन्ही संघ गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर गुजरात टायटन्सचा सहापैकी चार सामन्यात विजय आणि पराभव झालाय.

मोठा अपघात टळला
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या सामन्यापूर्वी ईशान किशन (Ishan Kishan) आणि शुभमन गिल थोडक्यात बचावलेत. वास्तविक या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर सराव करत होते. सरावानंतर ईशान किशन आणि शुभमन गिल (Shubman Gill) मैदानाच्या एका कडेला उभं राहून गप्पा मारत होते. इतक्यात मागून वेगाने आलेला चेंडू दोघांच्या अगदी बाजून गेला. त्यातच दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं. सुदैवाने चेंडू कोणालाही लागला नाही. गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

मुंबई इंडियन्ससाठी विजय महत्त्वाचा
स्पर्धेत सुरुवातीच्या दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्स सलग तीन विजय मिळवत जोरदार कमबॅक केलं. पण सहाव्या सामन्यात मुंबईला पंजाब किंग्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. अर्शदीप सिंगच्या भेदक बॉलिंगसमोर मुंबईला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे गोलंदाजी करताना मुंबईने शेवटच्या पाच ओव्हरमध्ये तब्बल 96 धावा दिल्या. त्यामुळे गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबईला डेथओव्हरवर जास्त काम करावं लागणार आहे. 

गुजरातची मजबूत गोलंदाजी
मुंबईच्या तुलनेत गुजरात टायटन्सची गोलंदाजी मजबूत आहे. मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, हार्दिक पांड्या या वेगवान गोलंदाजांना फिरकीपटू राशीद खानची साथ मिळल्याने गुजरातला हरवणं सोप नाहीए. गेल्या सामन्यात कमी धावसंख्या असतानाही गुजरातच्या गोलंदाजांनी लखनऊ सुपर जायंट्सच्या हातातून सामना हिरावून घेतला होता. 

मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टिम डेविड, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, विष्णु विनोद, कॅमरन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमनदीप सिंह, शम्स मुलानी, रिले मेरेडिथ, नेहल वढेरा, ऋतिक शौकीन, अरशद खान, डुआन जानसेन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

गुजरात टायटन्स
हार्दिक पांड्या (कर्णधार), श्रीकर भरत, अल्जारी जोसेफ, जोश लिटिल, अभिनव मनोहर, डेविड मिलर, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे, नूर अहमद, उर्विल पटेल, राशिद खान, रिद्धिमान साहा, आर साई किशोर, साई सुदर्शन, प्रदीप सांगवान, दासुन शनाका, विजय शंकर, मोहित शर्मा, शिवम मावी, शुभमन गिल, ओडियन स्मिथ, राहुल तेवतिया, मॅथ्यू वेड, जयंत यादव, यश दयाल