IND vs AUS : वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी शमीने आखली रणनीती, 'ही' युक्ती वापरत कांगारूंना गुंडाळणार

Mohammed Shami :  हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर जावं लागलं. हार्दिकच्या जागी कोण तर मोहम्मद शमीला संघात घेण्यात आलं. कॅप्टन रोहितचा विश्वासाला शमीने पूर्ण न्याय दिला. वर्ल्ड कपमधील प्रत्येक मॅचमध्ये शमीच्या गोलंदाजीपुढे चांगला चांगला खेळाडू निस्तनाभूत झाला. 

नेहा चौधरी | Updated: Nov 18, 2023, 04:08 PM IST
IND vs AUS : वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी शमीने आखली रणनीती, 'ही' युक्ती वापरत कांगारूंना गुंडाळणार title=
mohammed shami trick for australia team in world cup final india vs australia at ahmedabad

World Cup Final : अखेर तो क्षण आला आहे, रविवारी 19 नोव्हेंबरला टीम इंडियासोबत भारतीयांसाठी सर्वात मोठा दिवस असणार आहे. वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन फायनलचं तिकीट गाठलं. तर भारताने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री केली. या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला. भारतीय संघाचा कॅप्टन आणि ओपनर रोहित शर्माची दमदार खेळीसोबत संघातील प्रत्येकाने जबरदस्त कामगिरी केली आहे. (mohammed shami trick for australia team in world cup final india vs australia at ahmedabad)

हार्दिक पांडेला दुखापतीमुळे संघातून बाहेर व्हावं लागलं. त्यावेळी राखील खेळाडू असलेला मोहम्मद शमीची संघात एन्ट्री झाली. संघात खेळांची संधी मिळाल्यानंतर मोहम्मद शमीने या संधीचं सोनं केलं. प्रत्येक मॅचमध्ये विरोधातील खेळाडूंना धडकी भरेल अशी गोलंदाजी त्याने केली. एवढंच नाही तर सेमी फायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट घेत भारताच्या विजयात मह्त्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीसोबत शमीने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूचा मान मिळवला. वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जलद गतीने 50 बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. त्यामुळे फायनलमध्ये कांगारुचा लोवळण्यासाठी शमीने काय रणनिती आखली हे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

शमीची जबरदस्त कामगिरी

खरं तर या वर्ल्ड कपमध्ये शमीने करिष्माई गोलंदाजी पाहून प्रत्येकाला अवाक् केलं आहे. फायनलमध्येही तो अशीच कामगिरी करेल, अशी आशा प्रत्येकाला वाटत आहे. जर आपण टीम ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचं झालं तर सध्याच्या संघात पाच डाव्या हाताचे फलंदाज आहेत आणि शमीचा डाव्या हातांविरुद्धचा विक्रम चमकदार असल्याने तो उत्तम कामगिरी करेल असा विश्वास आहे. शमी डाव्या हातांविरुद्ध प्रत्येक 22 धावांमागे एक विकेट त्याने घेतली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील 30 टक्के विकेट डाव्या हातानेच घेतल्या आहेत. एवढंच नाही तर या वर्ल्डने 8 लेफ्टी फलंदाजांना बाद केलंय. पण आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने 4 धावा आणि 7 चेंडूत डाव्या हाताच्या फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठण्यात यशस्वी झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

अंतिम फेरीत रणनीती काय असेल?

शमीचं हे आकडे ऑस्ट्रेलियासाठी घातक आहे. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत शमी भारतासाठी दुसऱ्या क्रमांकावर देखील आहे. सध्याच्या गोलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. शमीने 24 सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत. शमीनेच सामन्यानंतर सांगितलं होतं की, विकेट घेण्यासाठी त्याने फक्त स्टंप-टू-स्टंप लांबी टाकण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू योग्य झोनमध्ये टाकलाय.

शमी म्हणाला की मी नेहमी परिस्थिती काय आहे, खेळपट्टी आणि चेंडू कसा आहे आणि चेंडू स्विंग होत आहे की नाही हे पाहतो. मी असा बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो जिथे तो बॅटच्या काठाला लागू शकतो आणि विकेट घेण्यात आपण यशस्वी झालो पाहिजे. प्रत्येक मॅचमध्ये माझा हाच प्रयत्न असतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

फायनलमध्ये शमीकडून अपेक्षा

अहमदाबादमध्ये तितका स्विंग मिळत नसला तरी सीम आणि स्पीडच्या मदतीने तो त्याला चकमा देऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणण आहे. फायनलमध्येही तो अशीच कामगिरी करेल, अशी आशा क्रिकेट विश्वातील तज्ज्ञांना व्यक्त केली आहे.