India vs South Africa Tests : सध्या टीम इंडिया साऊथ अफ्रिका दौऱ्यावर आहे. टी-ट्वेंटी, वनडे आणि टेस्ट या तिन्ही फॉरमॅटसाठी टीम इंडियाचे नवे छावे साऊथ अफ्रिकेत जोर लावताना दिसत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया येत्या 26 डिसेंबरपासून दोन कसोटी सामने खेळणार आहे. सेंच्युरीयनमध्ये पहिला कसोटी सामना होणार असून 3 ते 7 जानेवारी रोजी केप टाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. त्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू रवाना होणार आहेत. अशातच आता टेस्ट सिरीजपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी (Mohammad Shami) साऊथ अफ्रिका सिरीजमधून बाहेर होऊ शकतो.
नेमकं कारण काय?
मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे शमी आगामी साऊथ आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका खेळणार की नाही? यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. डॉक्टरांनी शमीला घोट्याच्या दुखापतीमुळे (Mohammed Shami Injury) विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. शमीची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने शमी यावर कोणता निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
शमी नाहीतर कोण?
मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार पराक्रम गाजवला होता. त्यामुळे शमीची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही. मात्र, शमी संघात नसेल तर आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यापैकी कोणा एका खेळाडूला संधी मिळू शकते.
टीम इंडियाचा कसोटी संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ: टेम्बा बावुमा (C), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरेन.