ओठ फाटले, रक्त वाहू लागलं! टेप लावून पुन्हा फलंदाजीला आला... अनिल कुंबळेची आठवण

Crircket : विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात जखमी झाल्यानंतरही तामिळनाडूचा बाबा इंद्रजीतने ओठांवर टेप लावून फलंदाजी केली. या घटनेने पुन्हा एकदा अनिल कुंबळेच्या आठवणी ताज्या झाल्या. 2002 मध्ये अनिल कुंबळेने जबडा दुखत असतानाही गोलंदाजी केली.

राजीव कासले | Updated: Dec 14, 2023, 05:06 PM IST
ओठ फाटले, रक्त वाहू लागलं! टेप लावून पुन्हा फलंदाजीला आला... अनिल कुंबळेची आठवण  title=

Vijay hazare trophy Baba Indrajith: विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये हरियाणाने तामिळनाडूचा (Hariyana vs Tamilnadu) 63 धावांनी पराभव केला. हिमांशु राणाचं नाबाद शतक आणि अंशुल कंबोजच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर हरियाणाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तामिळनाडूने पाचवेळा विजय हजारे ट्रॉफीचं  (Vijay Hazare Trophy) जेतेपद पटकावलं आहे. सहाव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्याचं त्यांचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं. हा सामना हरियाणाने जिंकला असला तरी सर्वात जास्त चर्चा झाली ती तामिळनाडूच्या बाबा इंद्रिजितच्या खेळीची. त्याच्या जिगरबाज खेळीचं सर्वत्र कौतुक होतंय. 

ओठ फाटले, रक्त वाहू लागलं
हरियाणाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये तामिळनाडूच्या बाब इंद्रजितने (Baba Indrajith) 64 धावांची खेळी केली. तामिळनाडूचा पराभव झाला, पण बाबा इंद्रजितच्या कामगिरीची इतिहासात नोंद  झाली. सामन्यादरम्यान बाब इंद्रजीतचा ओठ फाटला आणि रक्त वाहू लागलं. पण ओठांना टेप लावत संघासाठी बाबा पुन्हा मैदानात फलंदाजीसाठी उतरला. या घटनेने 2002 मधल्या अनिल कुंबळेबाबत घडलेल्या घटनेची आठवण झाली. अनिल कुंबळेने वेस्टइंडिजविरुद्धच्या एंटिगा कोसटीत जबडा दुखत असतानाही गोलंदाजी केली होती.

वेगाने आलेला चेंडू हेल्मेटला आदळला. चेंडूचा वेग इतका जास्त होता की बाबा इंद्रजितचा ओठ फाटला आणि त्यातून रक्त वाहू लागलं. पण बाबा इंद्रजीतने  हार मानली नाही. तोंडावर लावून तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. ज्यावेळी तो फलंदाजीसाठी आला तेव्हा तामिळनाडूची धावसंख्या 54/2 अशी होती. त्यानंतर 192 वर सातव्या विकेटच्या रुपात तो बाद झाला. 

बाबा बाद झाल्यानंतर तामिळनाडूचे इतर फलंदाज फार काळ मैदानावर तग धरू शकले नाहीत आणि 63 धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. हरियाणाने 7 विके गमावत 293 धावा केल्य होत्या. याला उत्तर देताना तामिळनाडूचा संघ 230 धावांवर ऑलआऊट झाला. हरियाणाचा वेगवान गोलंदाज कंबोजने 30 धावात चार विकेट घेत विजयात मोलाचं योगदान दिलं. आता राजस्थान आणि कर्नाटकदरम्यान दुसऱ्या सेमीफायनलमधल्या विजेत्या संघाशी हरियाणा अंतिम सामन्यात भिडेल.

बाबा इंद्रजीत हा बाब अपराजीतचा जुळा भाऊ आहे. बाबा अपराजीतने 2012मघ्ये अंडर19 विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. तर बाबा इंद्रजीतने 66 प्रथम श्रेणी सामन्यात 4511 धावा केल्या आहेत. 

अनिल कुंबळेची आठवण
बाबा इंद्रजीतच्या घटनेने भारताचा महान दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेची आठवण ताजी झाली. 2002 मध्ये कुंबळेने जबडा दुखत असतानाही गोलंदाजी केली होती. भारत-वेस्टइंडिजदरम्यानचा हा कसोटी सामना होता.  या सामन्यात अनिल कुंबळेने दिग्गज ब्रायन लाराची विकेट घेतली होती.